Headlines

सारोळ्यात दुर्गामाता विसर्जन मिरवणुकीत हलगीचा दणदणाट:यवतमाळच्या सेवालाल मित्रमंडळाच्या पथकाने आणली रंगत‎




येथील जयभवानी दुर्गामाता मित्रमंडळाच्या वतीने दुर्गामाता विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. पारंपरिक बैलगाडीतून काढण्यात आलेली देवीची आकर्षक मिरवणूक आणि यवतमाळ येथील सेवालाल मित्रमंडळाच्या हलगी पथकाच्या दमदार वादनाने या सोहळ्यात विशेष रंगत आणली. महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेचा ठसा उमटविणाऱ्या हलगीच्या निनादाने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. हलगीच्या तालावर भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पारंपरिक बैलगाडीतून काढण्यात आलेली देवीची मिरवणूक ग्रामस्थांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. या विसर्जन मिरवणुकीचे नियोजन जयभवानी दुर्गामाता मित्रमंडळाचे अध्यक्ष दादाराव दांडगे, उपाध्यक्ष योगेश दळवी, सचिव रवी कृष्णपक्ष तसेच मंडळाच्या सर्व सभासदांनी केले होते. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या नियोजनामुळे विसर्जन सोहळ्याला उत्साहपूर्ण स्वरूप प्राप्त झाले. पारंपरिक वाद्यांचा गजर, बैलगाडीतील देवीची मिरवणूक आणि भाविकांचा उत्साह यामुळे सारोळ्यातील दुर्गामाता विसर्जन सोहळा विशेष लक्षवेधी ठरला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *