Headlines

घोटी पोलिस ठाण्यामध्ये स्थानिक रोजगारावर चर्चा:जिंदाल कंपनी प्रशासन, ठेकेदारांची संयुक्त बैठक‎




घोटी मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म कंपनीत स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य मिळावे, या मागणीवर घोटी पोलिस ठाण्यात कंपनी प्रशासन, ठेकेदार आणि पोलिस प्रशासनाची संयुक्त बैठक झाली. पोलिस उपविभागीय अधिकारी संजय बांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत स्थानिक युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरात जिंदाल पॉलीफिल्म कंपनी कार्यरत आहे. कंपनीतील रोजगाराच्या संधींच्या तुलनेत स्थानिक तरुणांना अपेक्षित संधी मिळत नसल्याची भावना युवकांकडून व्यक्त होत असून, रोजगारात स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी पुढे आली आहे. या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी स्थानिक युवकांनी घोटी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिस प्रशासनाने कंपनी प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांसोबत बैठक आयोजित केली. पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी कंपनी प्रशासन आणि ठेकेदारांनी स्थानिक युवकांच्या अपेक्षा समजून घेऊन त्यांच्याशी संवाद ठेवावा, तसेच उपलब्ध कामांमध्ये जास्तीतजास्त स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे मार्गदर्शन केले. यावेळी पोलिस निरीक्षक विजय शिंदे, पोलिस हवालदार प्रकाश कासार यांच्यासह कंपनी प्रशासनाचे प्रतिनिधी, संबंधित ठेकेदार व इतर उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *