Headlines

38 शोरूम्समधून वाहनांची धडाक्यात डिलिव्हरी:नथ, मंगळसूत्राच्या खरेदीला पसंती, ई-बाईक, हायब्रीड कार्सची क्रेझ, 1-बीएचके ऐवजी 2-बीएचके घरांची मागणी



साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या गेलेल्या विजयादशमीच्या मुहूर्तावर सराफ बाजार, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक बाजार आणि रिअल इस्टेट या क्षेत्रांत खरेदीचा मोठा उत्साह दिसून आला. सणाच्या उत्साहाने दुष्काळाच्या चिंतेला मागे टाकत नगरकरांनी बाजारपेठेत खरेदीचे सी

.

शहरात १६ चारचाकी आणि २२ दुचाकी अशा तब्बल ३८ शोरूम्समध्ये सकाळपासूनच वाहनांच्या वितरणासाठी ग्राहकांची रीघ लागली होती. वाढत्या इंधन दरांमुळे दुचाकींमध्ये बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक (ईव्ही) वाहनांना, तर चारचाकीत ‘हायब्रीड’ (पेट्रोल अधिक बॅटरी) मॉडेल्सना ग्राहकांनी सर्वाधिक पसंती दिली. दुसरीकडे, सोन्याचे भाव स्थिर राहिल्याने सराफ बाजारातील उलाढालीचा वेग किंचित संथ वाटला, तरी मुहूर्ताचा मान म्हणून पारंपरिक नथ, तोडे व मंगळसूत्राच्या खरेदीलाच महिलांनी प्राधान्य दिले.

शहराच्या वाढत्या नागरीकरणामुळे सावेडी, नवनागापूर आणि कल्याण रोड भागात मध्यमवर्गीयांनी १-बीएचके ऐवजी प्रशस्त २-बीएचके फ्लॅट आणि रो-हाऊसला पसंती देत दसऱ्याच्या मुहूर्तावर गृहप्रवेश व नोंदणीचे सौदे पूर्ण केले. ग्रामीण व स्थानिक पातळीवर झेंडूची फुले, तोरणे आणि शेती अवजारांच्या खरेदीने चैतन्य आणले. दसऱ्याच्या सांस्कृतिक परंपरेनुसार शहरात दुपारी भव्य पथसंचलन काढण्यात आले.

सुरक्षा, मूलभूत सुविधांमुळे फ्लॅट्सना सर्वाधिक मागणी ^सध्या ५० लाखांच्या आत किंमतीत असलेल्या फ्लॅट्सना शहरात मागणी राहिली आहे. ग्राहकांचा कल फ्लॅट परिसरातील सुरक्षा, मूलभूत सुविधांकडे राहिला . ग्रामीण ग्राहकांची संख्या कमी असल्याने काहीसा परिणाम या व्यवसायावर झाला आहे, – अमित गटणे, बांधकाम व्यावसायिक.

स्मार्ट वॉचसह मोबाईल खरेदीची क्रेझ कायम इलेक्ट्रॉनिक बाजारात यंदाही टीव्ही, फ्रिज किंवा वॉशिंग मशीनसारख्या घरगुती वापराच्या मोठ्या वस्तूंच्या खरेदीलाच प्राधान्य दिले गेले; मात्र आता या खरेदीसोबतच ग्राहकांकडून स्मार्टफोन आणि वैयक्तिक वापराच्या ‘स्मार्ट गॅजेट्स’च्या खरेदीलाही सर्वाधिक पसंती मिळत आहे. विशेषतः युवा वर्गासह सर्वसामान्य नागरिकांमध्येही स्मार्ट वॉच, डिजिटल डिस्प्ले रिस्ट बँड आणि बोटात घालता येणाऱ्या ‘स्मार्ट रिंग’च्या खरेदीकडे कल मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

दोन महिने अगोदरच वाहने बुक ^यंदा चारचाकी वाहन खरेदीत ‘हायब्रीड’सह ‘ईव्ही’ कारची क्रेझ होती. प्रामुख्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमुळे ग्राहक या वाहनांना प्राधान्य देत आहेत. शिवाय, सुरक्षेच्या दृष्टीने वाहन खरेदीवर देखील ग्राहकांचा यंदा भर राहिला. या सणासाठी दोन महिने अगोदरपासूनच ग्राहक वाहने बुक करत होते.- जनक आहुजा, ऑटोमोबाईल व्यावसायिक.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *