Headlines

बाणेर परिसरात नागरिकाला लुटणारी टोळी गजाआड:चौघांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात




बाणेर परिसरात एकाला धमकावून त्याच्याकडील सोन्याचे ब्रेसलेट, सोनसाखळी, तसेच रोकड असा ऐवज लुटणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले.
पवन रामदास पारगे (वय 18, रा. धायरी फाटा, सिंहगड रस्ता), साहिल बाळासाहेब मरगळे (वय 19, रा. कोल्हेवाडी, खडकवासला, सिंहगड रस्ता), विशाल बाळासाहेब झोडगे (वय 18, रा. कदम वाडा, धायरी गाव), आदित्य हरिश्चंद्र कोळकर (वय 18, रा. शिंदे चाळ, गारमाळ, धायरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. बाणेर परिसरातील पॅनकार्ड क्लब रस्त्याने 1 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री तक्रारदार निघाले होते. त्या वेळी आरोपींनी त्यांना अडवले. त्यांना धमकावून हातातील सोन्याचे ब्रेसलेट, सोनसाखळी काढून घेतली. त्यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने 18 हजार 999 रुपये घेतले. आरोपी दुचाकीवरुन पसार झाले. पादचाऱ्याने याबाबत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. लूटमार करणारे चोरटे धायरी भागातील असल्याची माहिती तपासात मिळाली. पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. या प्रकरणात चौघांसह एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, सहायक आयुक्त ब्रह्मदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय खिल्लारे, सहायक निरीक्षक गणेश रायकर, गणेश गायकवाड, बाबा आहेर, किसन शिंगे, संदेश निकाळजे, संजय दहिभाते, शरद राऊत, अतुल इंगळे यांनी ही कारवाई केली. सराइतांकडून पिस्तूल जप्त देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइतांना सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल, काडतूस जप्त करण्यात आले. सूर्यराज मनोज निंबाळकर (वय 20, रा. श्री गजानन सोसायटी, गोकुळनगर, नऱ्हे), गौरव राजू घाडगे (वय 20, रा. शांती प्रेस्टीज सोसायटी, वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. निंबाळकर आणि घाडगे यांच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. सिंहगड रस्ता परिसरात पोलिस कर्मचारी विनायक मोहिते, राहुल ओलेकर हे गस्त घालत होते. एकतानगरी परिसात दोघे जण थांबले होते. त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती त्यांना मिळाली. सापळा लावून पोलिसांनी दोघांना पकडले. त्यांच्याकडून पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. दोघांनी पिस्तूल का बाळगले ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त डॉ. सागर कवडे, सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक समीर गायकवाड, उपनिरीक्षक भूपेश साळुंके, उत्तम तारु, अण्णा केकाण, प्रफुल्ल चव्हाण, सतीश मोरे, विकास बांदल यांनी ही कामगिरी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *