Headlines

औसा हादरले:बसस्थानकासमोर युवकावर धारदार कोयत्याने हल्ला, आरोपी थेट पोलिस ठाण्यात दाखल, कारण अस्पष्ट




लातूर जिल्ह्यातील औसा शहरातील जुन्या बसस्थानकासमोर एका युवकावर धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, हल्ला केल्यानंतर आरोपीने स्वतः औसा पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले आहे. मात्र, हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप अस्पष्ट असून पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. औसा शहरातील जुन्या बसस्थानकासारख्या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी ही थरारक घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. आरोपी स्वतः पोलिस ठाण्यात हजर या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सूत्रे हलवली. विशेष म्हणजे, हल्ला केल्यानंतर आरोपी स्वतःहून औसा पोलिस ठाण्यात जाऊन शरण आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला अधिक वेग आला आहे. हा हल्ला नेमका कोणत्या पूर्ववैमनस्यातून किंवा कारणातून करण्यात आला, याचा कसून शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. पोलिसतपासातून या प्रकरणाचा सविस्तर तपशील लवकरच स्पष्ट होईल. छत्रपती संभाजीनगरात डोक्यात रॉड मारून मित्राचा खून नवरात्रोत्सवात दांडिया खेळण्यासाठी गेल्यानंतर मित्रांसोबत फिरत असताना झालेल्या किरकोळ वादात आईवरून शिवी दिल्याच्या रागातून 20 वर्षांच्या तरुणाची त्याच्याच मित्राने लोखंडी रॉडने हत्या केली. मुकुंदवाडीतील संघर्षनगर भागात सोमवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. पुष्कर सतीश गाडे (20, रा. संघर्षनगर) असे मृताचे नाव आहे. त्याचा मित्र महेश पवार ऊर्फ भोऱ्या (रा. संजयनगर) याला अटक करण्यात आली असून त्याला 23 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुष्करचे वडील सतीश गाडे टेम्पोचालक आहेत. पुष्कर एका नामांकित कपड्यांच्या दुकानात काम करत होता. सोमवारी रात्री दांडिया खेळून झाल्यानंतर मध्यरात्री पुष्कर, महेश आणि इतर मित्र परिसरात फिरत होते. या वेळी पुष्कर व महेशमध्ये किरकोळ वाद झाला. रागाच्या भरात पुष्करने महेशला आईवरून शिवी दिली. त्यामुळे महेशचा राग अनावर झाला. पुष्करने पँटमध्ये लपवलेला लोखंडी रॉड काढून महेशच्या गुडघ्यावर मारला. महेशने तोच रॉड हिसकावून घेत पुष्करच्या डोक्यात व मानेवर प्रहार करून त्याची हत्या केली. पहाटे ४ वाजता पुष्करचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला.सहायक आयुक्त मनीष कल्याणकर व निरीक्षक सोनवणे यांच्या पथकाने महेशला ताब्यात घेतले. त्याने चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला पोलिस कोठडी आरोपी महेशला 23 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. फॉरेन्सिक टीमद्वारे घटनास्थळाचे आणि रक्ताच्या नमुन्यांचे विश्लेषण, हत्यार (रॉड) जप्ती आणि मध्यरात्री घटनास्थळी किंवा परिसरात उपस्थित असलेल्या साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचे काम पोलिस करतील. दोघेही होते जिवलग मित्र पुष्कर आणि महेश हे दोघे जिगरी दोस्त होते. परिसरात ते कायम सोबतच दिसायचे. रात्री पुष्कर न आल्याने आईने थेट महेशलाच फोन केला होता, यावरून त्यांची मैत्री किती घट्ट होती हे स्पष्ट होते. मात्र, मध्यरात्री क्षुल्लक वादात याच मित्राने दुसऱ्याचा जीव घेतला. मैत्रीचा असा भयंकर शेवट पाहून सर्वांना धक्का बसला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *