Headlines

पूर्णेकर हत्या:राजा शिंदेने आरोपीस दिले शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण; मुलाचा दावा, मीनाक्षी शिंदे व राजा शिंदे यांना तात्काळ अटक करण्याची मुलाची मागणी




शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. एकीकडे पोलिस माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र ऊर्फ राजा शिंदे यांची कसून चौकशी करत असताना दुसरीकडे मृत प्रदीप यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी पत्रकार परिषदेत व्हिडिओ पुराव्यासह सादर केला. या व्हिडिओमध्ये राजेंद्र शिंदे मुख्य आरोपी निखिल यादवला थेट बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण देताना दिसत असल्याचा दावा राम पूर्णेकर यांनी केला आहे. वडिलांच्या हत्येला २२ दिवस उलटूनही ठोस तपास न झाल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी राजेंद्र शिंदे व मीनाक्षी शिंदे यांच्या तात्काळ अटकेची आक्रमक मागणी केली. या प्रकरणातील पाचवा संशयित आरोपी अमित सिंग नसून राजा शिंदे स्वतःच असल्याचा दावा त्यांनी केला. शिंदे आरोपींना पुणे येथील मुळशी येथे घेऊन गेले होते, असाही आरोप आहे. तसेच राजेंद्र शिंदेंच्या फोटोला एआय तंत्रज्ञानाने हेल्मेट घातल्याचा संदर्भ आणि त्यांचा संतोष टल्लीसोबतचा फोटोही समोर आणला. व्हायरल व्हिडिओत बॅग घेऊन नाचणारा ‘कदम’ रेकी करत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. संविधानावर पूर्ण विश्वास असून न्याय नक्कीच मिळेल, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. पोलिसांकडून राजा शिंदेंची पाचव्यांदा चौकशी सुरू प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात बुधवारी राजेंद्र शिंदेंची सलग पाचव्यांदा चौकशी सुरू आहे. आतापर्यंत राजा शिंदेंची तब्बल ३६ तास चौकशी करण्यात आली आहे. याआधी अटक झालेले आरोपी संतोष टल्ली, अमित पपलू आणि राजेंद्र शिंदे यांना समोरासमोर बसवून पोलिसांनी कसून सवाल-जबाब केले आहेत. आता या नव्या व्हिडिओ आणि पुराव्यांनंतर पोलिस काय कायदेशीर पावले उचलतात आणि तपासाची दिशा कशी बदलते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *