Headlines

Sushma Andhare Statement on Maratha Quota Audio Clip Controversy


“मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेल्या 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये बोलणारी हिंदी भाषिक महिला ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी अहिल्यानगरमध्ये सर्व्हेक्षण आणि ‘परसेप्शन’ (प्रतिमा निर्मिती) करणार्‍या टीमची मुख्य महिल

.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत अंधारे यांनी जरांगे यांनी जाहीर केलेली ऑडिओ क्लिप, महायुतीमधील अंतर्गत सत्तासंघर्ष, मराठा-ओबीसी आरक्षणातील कलगीतुरा आणि रामदास कदम यांच्या भाषेचा सविस्तर समाचार घेतला.

500 कोटींच्या क्लिपमधील ती महिला कोण?

ऑडिओ क्लिपमधील संभाषणावर आणि त्यातील महिलेच्या भूमिकेवर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “अहिल्यानगरमधील काही सजग नागरिकांनी मला सांगितले की, या क्लिपमधील महिलेचा आवाज ओळखीचा वाटतो. एकनाथ शिंदे यांच्यासाठी जनमत आणि परसेप्शन तयार करण्याचे काम करणार्‍या टीममध्ये ती काम करत होती. ‘मोदी है तो मुमकिन है’, ‘फडणवीस म्हणजे अतिबुद्धिमान’ किंवा ‘एकनाथ शिंदे म्हणजे अनाथांचा नाथ’ असे राजकीय परसेप्शन सेट करणार्‍या टीमची ही मुख्य महिला असावी, अशी माहिती समोर येत आहे. याबद्दल अधिक माहिती व नाव समोर आल्यास मी त्यावर अधिक बोलेन.”

सायबर तपासणीची मागणी

“ही एका व्हर्च्युअल किंवा झूम बैठकीची रेकॉर्डिंग असल्याचे दिसते. सायबर पोलिसांसाठी या बैठकीचा डिजिटल डेटा, हॅश व्हॅल्यू आणि ही मीटिंग नेमकी कोणी होस्ट केली होती, हे शोधणे अजिबात अवघड नाही. सरकारने तातडीने या बैठकीचा आयोजक शोधून काढावा.”

ऑडिओ क्लिप प्रकरणाचे 3 महत्त्वाचे कंगोरे

जरांगे यांनी ऐकवलेल्या या ऑडिओ क्लिपच्या टायमिंगवर आणि राजकीय घडामोडींवर अंधारे यांनी विश्लेषण केले…

  1. मराठा आरक्षणाचे एक मोठे आंदोलन बदनाम करणे आणि आंदोलनाबद्दल समाजात शंका व संभ्रम निर्माण करणे.
  2. उद्या पदवीधर मतदारसंघाचे मतदान होत असताना, अगदी मतदानाच्या आदल्या दिवशी हे सर्व प्रकरण बाहेर आणले गेले आहे.
  3. एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील आमदार व नेते त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याच्या वल्गना करत असतानाच, शिंदे आणि भाजप यांच्यातील राजकीय कुरघोडी यातून चव्हाट्यावर आली आहे.

शिंदे-फडणवीसांचा सत्तेसाठी ‘चेकमेट’चा खेळ

आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात निर्माण झालेल्या सामाजिक तणावावर त्यांनी महायुतीला जबाबदार धरले. “मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण किंवा आरक्षण उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर मी कधीही जातनिहाय राजकारण करत नाही. मात्र, आरक्षण उपवर्गीकरणात एक बाजू शिंदे उचलून धरतात, तर दुसरी बाजू फडणवीस उचलून धरतात. एका बाजूला शिंदेंकडून रसद पुरवली जाते, तर दुसर्‍या बाजूला फडणवीसांकडून बळ दिले जाते. हे दोघेही एकमेकांना ‘चेकमेट’ करण्यासाठी आणि खुर्चीच्या झुंजीसाठी हा कलगीतुरा चालवत आहेत.”

गावगाड्याची वीण उसवली

“या सत्तासंघर्षात राजकीय नेते आपले स्कोअर सेट करत आहेत; मात्र सर्वसामान्य मराठा आणि सर्वसामान्य ओबीसी समाज यात नाहक भरडला जात असून ग्रामीण भागातील सामाजिक ऐक्य धोक्यात आले आहे.”

रामदास कदमांची भाषा हिणकस

शिवसेना नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या वक्तव्यांवर अंधारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “रामदास कदम हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याकडून अशा भाषेची अपेक्षा नव्हती. दसरा मेळाव्यात त्यांनी जरांगेंवर ज्या हिणकस आणि एकेरी शब्दांत टीका केली, ती महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाही. राजकीय टीका जरूर करावी; पण भाषेचे भान राखले पाहिजे.”

गृहखात्यामार्फत चौकशीची गरज

“रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम हे गृहखात्यात जबाबदार पदावर आहेत. त्यामुळे वडिलांनी संशय व्यक्त करण्यापेक्षा, त्यांनी स्वतः गृहखात्यामार्फत या संपूर्ण ऑडिओ क्लिपचा आणि त्यातील संभाषणाचा छडा लावला पाहिजे.” मनोज जरांगे पाटील यांनी ‘आपल्याला मारून टाकतील’ अशी व्यक्त केलेली भीती फेटाळून लावताना अंधारे म्हणाल्या की, “एखाद्या आंदोलनाच्या प्रणेत्याला संपवणे इतके सोपे नसते; मात्र प्रणेत्याभोवती अफवा पसरवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे.”

————————————————————-

हेही वाचा…

माझ्याविरोधात बोलणाऱ्यांना भाजपने पार्टी फंड पुरवला!: मनोज जरांगेंकडून 500 कोटींच्या दाव्याची स्फोटक ऑडिओ क्लिप जाहीर; शिंदे-फडणवीसांना षड्यंत्र थांबवण्याचा इशारा

“मराठा आरक्षण आंदोलन चिरडण्यासाठी, मला बदनाम करण्यासाठी आणि आंदोलनात फूट पाडण्यासाठी गेल्या 3 वर्षांपासून सत्ताधारी वर्तुळात एक अतिशय भयानक आणि नियोजनबद्ध कट शिजत आहे. माझ्या विरोधात बोलणाऱ्या मराठा तरुणांनाच हाताशी धरून, त्यांना पक्षाचा किंवा वैयक्तिक फंड पुरवून, गाड्या आणि मोर्चांचा खर्च देऊन मला राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करण्याची रणनीती आखली गेली. ‘बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला’ म्हणणाऱ्यांनी आता हे पुरावे ऐकावेत. जर हे षड्यंत्र थांबवले नाही, तर माझ्याकडे असा महास्फोट आहे की या राज्यात सत्ताधाऱ्यांना पाय ठेवायलाही जागा उरणार नाही,” असा खळबळजनक इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.