Headlines

'500 कोटी आणले, पण जरांगेंना दिलेच नाहीत, हा खरा ट्विस्ट':किशोरी पेडणेकरांचा गंभीर आरोप; रामदास कदम यांच्यावरही साधला निशाणा




शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपने दिलेले ५०० कोटी रुपये शिंदेंच्या मुलाने आणले मात्र ते जरांगे यांना दिले नाहीत, असा गंभीर आरोप करत त्यांनी व्हायरल ऑडिओ क्लिप ‘एआय’ने बनवल्याचा रामदास कदम यांचा दावा फेटाळून लावला आहे. यासोबतच रामदास कदम यांच्या केवळ चर्चेत राहण्यासाठी बेताल बडबड करण्याच्या सवयीवरून पेडणेकर यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले असून कदम यांचे हे वागणे आता शिंदेंनाच भारी पडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं की, ५०० कोटी दिले, भाजपने. शिंदेंचा मुलगा घेऊन आले आणि जरांगेला दिले नाही. हा खरा ट्विस्ट आहे. आता ते म्हणतात की ऑडिओ क्लिप ही बरोबरच नाहीये. ती एआय आहे. एआय आत्ता आलं… काय बोलतायत त्यांचं त्यांना कळतंय का? मुळामध्ये एआय अती डेव्हलप हे आता झालं… इथं २०२२ काय २३… २३ ची काहीतरी… आणि हा साक्षात्कार रामदास कदमनी लावलाय. माझ्याकडे तर केव्हाच आली होती, मग एवढा वेळ तुम्ही का थांबलात? का नाही छडा लावलात? असा सवाल पेडणेकर यांनी रामदास कदम यांना केला आहे. भाजपमध्ये पण मुख्यमंत्री होण्यासाठी कॉम्पिटिशन पुढे बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, भाजपमध्ये पण मुख्यमंत्री होण्यासाठी कॉम्पिटिशन आहे. वांद्रे टू… दहिसर… ही कॉम्पिटिशन आहे. हे ते आम्हाला पण कळतं. या सगळ्या कॉम्पिटिशनमधून लांब केलं का मग म्हणायचं असं… मी कोणाचं नाव नाही घेत. पण मग मुख्यमंत्री सांगतायत दोन वर्षांपासून म्हणजे हे आहे हे पक्कं आहे. आणि हे काय आत्ता दिले म्हणतच नाहीयेत. हे जे आमदार-बिमदार फुटले ते कुठल्या जीवावर फुटले? खासदार फुटले कुठल्या जीवावर? कुठला विकास? आत्ता विचारा जे आमदार, खासदार फुटलेत, कुठली गंगा घेऊन गेलेत? तोंड दाखवायला लाज वाटतेय त्यांना आता, अशी टीका पेडणेकर यांनी शिंदे गटात गेलेल्या खासदारांवर केली. रामदास कदम नेहमीच चर्चेत राहण्यासाठी वाटेल ते बरळतात रामदास कदम यांच्यावर टीका करताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मी पण आज ४०-४२ वर्षे या पक्षात काम करते आणि कोअर कमिटीमध्ये काम करते. अगदी नेतेपदापासून… उपविभागप्रमुख, विभागप्रमुख त्यामुळे आम्ही त्या सगळ्या चर्चेत असतो. बाळासाहेब असताना असायचो, उद्धवजी तर आता घेतातच आम्हाला चर्चेत. त्यामुळे आम्हाला माहितीये, रामदास कदम नेहमीच चर्चेत राहण्यासाठी वाटेल ते बरळतात. हा आमच्या पक्षातला आम्हाला अनुभव आहे. आता ते बरळणं शिंदेंना भारी पडतंय. पण शिंदेंना ते ऐकेनासे झालेत. भाजपचे निष्ठावंत आज रडतायत मुख्यमंत्री बऱ्याच जणांचे ‘लाड’ करतात. त्याच्यातले हे ‘लाड’ कोणते मला नाही माहिती. आणि… सगळ्यांनी मूळ पक्ष सोडून आपापले लाड करून घेतलेत. कोणी निष्ठावंत तिथे नाही. उलट भाजपचे निष्ठावंत आज रडतायत, कुढतायत. आणि उघड्या डोळ्यांनी हा सगळा जो भ्रष्टाचार, व्यभिचार आहे या राजकारणातला तो बघतायत. त्यांनाही सहन नाही होतंय, पण बुक्क्याचा मार खात खात निष्ठावंत भाजपचे तिथे थांबतायत. त्यांना उलट सॅल्युट आहे. आदित्य ठाकरेंनी रामदास कदम यांचा खरा चेहरा समोर आणला मला त्या रामदास कदमांच्या ना वागणुकीचं गूढच कळत नाही. बेताल वागणं, बेताल बोलणं आणि ज्या वेळेला बाळासाहेबांनी किंवा उद्धवजींनी, पण ही तरुण मुलं जेव्हा येतात तेव्हा ह्यांना कळतं की ह्यांना वयाचं, मानाचं, सन्मानाचं काही अक्कल शिल्लक दिसत नाही. मग ते आता ते कायम आमच्या आदित्यावर बोलत असतात. कारण आदित्यानी तुमचा खरा चेहरा लोकांसमोर आणला. त्यामुळे आदित्यावर वाटेल ते आरोप होतायत. पण आदित्य बाळासाहेबांचा नातू आहे, ठाकरे घराण्याचं ते रक्त आहे, कुठल्याही वाईट कर्मात ते जाणारच नाहीत. हे आमच्या सर्व या देशातल्या नागरिकांना, महाराष्ट्राला माहितीये. त्यामुळे तुम्ही तुमचं काम करत राहा कारण तुम्ही त्याच कामासाठी बदनाम आहात. महाराष्ट्रामध्ये महिला, बालक कोणी सुरक्षित नाही ठाण्यातील पूर्णेकर हत्या प्रकरणी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, आज ठाण्यात काय घडलंय? ठाण्यातल्या अजूनही तो तपास त्या दिशेने होताना दिसत नाहीये. आम्ही कोणाचंच नाव नाही घेत. कोणी केलं असेल काय… ज्यांनी कोणी केलंय त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. एका व्यक्तीचा त्याच्या बसलेल्या जागी त्याचा खून पाडला जातो. परत तिथे अनेकदा काय काय घडतंय. उपमुख्यमंत्री, पालकमंत्री कोण आहेत? त्यामुळे मला असं वाटतं, महाराष्ट्रामध्ये दंगेखोरपणा वाढलाय, महाराष्ट्रामध्ये महिला, बालक कोणी सुरक्षित नाही. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि तुम्ही कुठल्याही चौकशा लावा पण चौकशांचा अंत काय? कधी? काय? हे लोकांना कळलं पाहिजे, अशी मागणी पेडणेकर यांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *