Headlines

'एकनाथ शिंदेंनी हिंमत केली नसती तर भाजपला सत्ता दिसली नसती':शिंदेंचा गळा इतका नाजूक नाही की कुणी केसाने कापेल- राज्यमंत्री प्रतापराव जाधव




दीड वर्षांपूर्वीची ऑडिओ क्लिप विधान परिषद निवडणुकीच्या नेमकी एक दिवस आधी बाहेर काढण्यात मनोज जरांगे पाटील यांचा हेतू काय आहे? याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा मराठा समाजाचं एक मोठं नेतृत्व आहेत. शिंदे यांचा गळा इतका नाजूक नाही की, तो कुणी केसाने कापेल. पण सध्या जे काही चाललं आहे ते चांगलं नाही, असेही जाधव यांनी स्पष्ट केले. तसेच एकनाथ शिंदेंनी ती हिंमत केली नसती तर भाजपला आज सत्ता दिसली नसती, असेही विधान जाधव यांनी केले आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात बोलताना प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की, आम्ही विदर्भातील 99 टक्के मराठा-ओबीसी असतानाही जरांगेंच्या आंदोलनाला विरोध न करता नेहमी पाठिंबाच दिला आहे. यात आमच्याही मुलाबाळांचं नुकसान आहे, कारण ओबीसींची संख्या वाढली तर विदर्भातील आमच्याही पोराबाळांना फटका बसू शकतो. मात्र, केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आम्ही ओबीसी असतानाही याला कधी विरोध केला नाही, अशी स्पष्ट भूमिका प्रतापराव जाधव यांनी मांडली. एकनाथ शिंदेंनी हिंमत केली नसती तर भाजपला सत्ता दिसली नसती पुढे बोलताना प्रतापराव जाधव म्हणाले, आम्ही 50 लोकांनी भाजपला मदत केली म्हणून भाजप सत्तेत आली. एकनाथ शिंदेंनी ती हिंमत केली नसती तर भाजपला सत्ता दिसली नसती. भाजपने महाराष्ट्रात कमी आमदार असून मुख्यमंत्री केलं नाही. तर बिहारमध्येही कमी आमदार असूनही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केलं. जर प्रवीण दरेकरांना आक्षेप घ्यायचा असेल तर त्यांनी एनडीएच्या नेत्यांवर व त्यांच्या निर्णयावर आक्षेप घ्यावा. मात्र एकनाथ शिंदे यांचा गळा इतका नाजूक नाही की, तो कुणी केसाने कापेल. जे काही चाललं आहे ते चांगलं नाही. आमचा आवाज कुणीही दाबू शकत नाही मनोज जरांगे पाटील यांचे आरोप गंभीर आहेत, त्याची चौकशी झालीच पाहिजे. जर या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपच्या लोकांचं नाव येत असेल तर भाजपनेच सर्वात आधी याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी प्रतापराव जाधव यांनी केली आहे. तसेच आमचा आवाज कुणीही दाबू शकत नाही, जे सत्य आहे ते जनतेसमोर यायला हवं. गेली विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच लढल्यामुळे इतकं यश मिळालं आहे. मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण हे एकनाथ शिंदे साहेबांनीच दिलं आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. एकनाथ शिंदे सारख्या नेतृत्वाला कुणी बदनाम करायचा प्रयत्न करत असेल तर सर्व सैनिकांच्या मनात चीड निर्माण झालेली आहे. श्रीकांत शिंदे सारख्या उभरत्या नेतृत्वाला सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. काँग्रेस हा संपलेला विषय आहे. त्यामुळे ते कुठल्यातरी माध्यमातून जनाधार शोधण्याचा प्रयत्न करतात, अशी टीका जाधव यांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *