![]()
सरकारची कर्जमाफी योजना बोगस असून, 56 लाख शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी मिळालेली नाही. राज्यात दुष्काळाची दाहकता भीषण असताना सरकार केवळ फालतू विषयांवर चर्चा करत आहे. त्यामुळे नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी खर्च केले जाणारे ३८ हजार कोटी रुपये दुष्काळ निवारणासाठी वापरावेत, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. रविकांत तुपकर यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे कर्जमाफीत फसवणूक अन् सिबिल खराब: राज्य सरकार आणि बँकर्स कमिटीमध्ये भांडण सुरू आहे. सरकार बँकांना केवळ मुद्दल पाठवत आहे, पण शेतकऱ्यांचे थकीत व्याज तसेच दिसत आहे. यामुळे बँकेत गेल्यावर शेतकऱ्यांचे ‘सिबिल’ (CIBIL) स्कोअर खराब होत आहे. ही शेतकऱ्यांची मोठी फसवणूक आहे. हेक्टरी १ लाखाची मदत द्या: विदर्भात खरीप पीक कर्जाची मुदत वाढवली पाहिजे. नियमित कर्ज भरणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना सरकारने २ लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान द्यावे आणि सरसकट हेक्टरी १ लाख रुपयांची मदत करावी. कुंभमेळ्याचा निधी दुष्काळाकडे वळवा: ‘अल निनो’चे संकट येणार हे सरकारला मागील वर्षीच माहीत होते, तरीही कोणतीही उपाययोजना केली नाही. लोक गावे सोडून शहराकडे स्थलांतर करत आहेत. त्यामुळे नाशिकचा कुंभमेळा पुढे ढकलून तो ३८ हजार कोटी रुपयांचा निधी दुष्काळासाठी वापरावा. चारा छावणी नको, दावणीला चारा द्या: यापूर्वी चारा छावण्यांच्या नावाखाली राज्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे आम्हाला चारा छावणी नको, तर थेट दावणीला चारा द्या किंवा घरपोच चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना थेट पैसे द्या. विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना अटक करा: नांदेडमधील शेतकरी चंद्रकांत शिंदे यांना विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अपहरण करून मारहाण केली आणि फाशी घेण्यास प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप तुपकरांनी केला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल होऊनही कुणालाही अटक झालेली नाही, ती तात्काळ व्हावी. मायक्रो फायनान्सची दादागिरी: ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स कंपन्या आणि पतसंस्थांकडून शेतकऱ्यांवर दादागिरी सुरू आहे. सरकारने यावर तातडीने बैठक घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा. या पत्रकार परिषदेला संघटनेचे राज्य सचिव सचिन पांडुळे, उपाध्यक्ष जयवंत दहीभाते, विनीत लिमये आणि राजाभाऊ ढमाले उपस्थित होते. ———— हेही वाचा.. तुम्हाला महाराष्ट्राचा विकास आणि तरुणांना रोजगार नकोय का?:कर्जत प्रकल्पावरून चित्रा वाघ यांचा राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रोहित पवारांवर घणाघात
कर्जत प्रकल्पावरून आणि वृक्षतोडीवरून सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आदित्य ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. या टीकेला आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले असून, विकासाला आणि रोजगाराला विरोध करणे हीच विरोधी पक्षाची एकमेव नीती बनली आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे. सविस्तर वाचा
Source link
सरकारने कर्जमुक्तीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केली:56 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित, कुंभमेळ्याचा निधी दुष्काळासाठी वापरा- रविकांत तुपकर