![]()
महिंद्रा अँड महिंद्राच्या नागपूर ग्रीनफिल्ड प्रकल्पासाठी बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात ८०० एकर जमिनीचा ताबा सोमवारी (२६ ऑक्टोबर) कंपनीला मिळाला. १५ हजार कोटींहून जास्त गुंतवणुकीच्या या प्रकल्पातून २० हजारांहून जास्त प्रत्यक्ष रोजगार मिळण्याची शक्यता आहे. यामुळे विदर्भाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) नागपूर कार्यालयाने हा ताबा दिला. प्रादेशिक अधिकारी मनोहर पोटे आणि मुख्य अभियंता राजेश झंजाळ यांनी कंपनी प्रतिनिधींना जमीन दिली. कंपनीचे डॉ. विनय खानोलकर, नितीन वैद्य आणि आशिष सोडते यांनी ताबा घेतला. कपील चंद्रायनही उपस्थित होते. या प्रकल्पासाठी महिंद्राला एकूण १,५०० एकर जमीन देण्याचे ठरले आहे. त्यापैकी ८०० एकरचा ताबा आता मिळाला आहे. उर्वरित ७०० एकरचा ताबा लवकरच मिळेल. पहिल्या टप्प्यातील जमिनीसाठी कंपनीने एमआयडीसीला ७०६ कोटींहून जास्त रक्कम भरली आहे. या प्रकल्पातून दरवर्षी सात लाखांहून जास्त व्यावसायिक वाहने बनवण्याचे नियोजन आहे. यामुळे विदर्भात पूरक उद्योग, वाहतूक आणि सेवा क्षेत्रालाही संधी मिळतील.
Source link
बुटीबोरीत महिंद्राला 800 एकर जमिनीचा ताबा:15 हजार कोटींचा प्रकल्प, 20 हजार रोजगार निर्मितीची अपेक्षा