![]()
राहुल चाबुकस्वार आणि त्याच्या टोळीवर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाईचे आदेश दिले आहेत. गेल्या १५ दिवसांत या टोळीवर झालेली ही दुसरी ‘मोक्का’ कारवाई आहे. या टोळीतील ६ आरोपींना अटक केली
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने ३० सप्टेंबर रोजी औद्योगिक कंत्राटदार ज्ञानेश्वर बारे यांच्याकडे १२ कोटी रुपये कमिशन मागितले व त्यांना शिवीगाळ केली. त्यांच्याजवळील मजुरांच्या पेमेंटची ७ लाख २५ हजारांची रोकड आणि इनोव्हा कार बळजबरीने नेली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या एका घटनेत, सुनील पाटील या बिल्डरला १ कोटी रुपये व्याजाने देऊन सव्वा कोटी रुपये परत घेतले. नंतर आणखी पैशांसाठी त्यांच्या घरावर दगडफेक केली होती.
या टोळीवर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, दरोडा, बलात्कार, बालकांचा लैंगिक छळ आणि हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन असे गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर आणि एमआयडीसी सिडकोचे वरिष्ठ निरीक्षक गणपत राहिरे यांच्या पथकाने मोक्का कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता.
यांच्यावर लावला मोक्का
टोळीप्रमुख राहुल साहेबराव चाबुकस्वार (रा. हुसेन कॉलनी) याच्यासह नीलेश रांजणे, अमोल साळुंके, आकाश साळुंके, सुधीर कातकडे, अलीम शेख, सागर कीर्तिकर, सुनील शिंदे, आकाश गायकवाड, सचिन मुगदल, अजय डोखळे, आकाश मुखेदल, संदीप, विशाल आणि अजय रगडे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.