![]()
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबरला पार पडलेल्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील ‘रेसोनेट लॉजिस्टिक्स एलएलपी’ येथे सकाळी ८ वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल. निवडणुकीत ४१ उमेदवार रिंगणात असून, पसंतीक्रम पद्धती
.
नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी सकाळी ७ वाजता मतमोजणी कक्षात उपस्थित राहतील. त्यानंतर ७.३० वाजता उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींसमोर स्ट्राँग रूम उघडण्यात येईल. सकाळी ८ वाजता मतपत्रिकांची मोजणी सुरू होईल.
२०२० मध्ये मतमोजणीला २३ तास : सुरुवातीला प्रत्येक मतपेटीवरील सील तपासून ती प्रतिनिधींसमोर उघडली जाईल. आतील मतपत्रिकांची संख्या तपासून, प्रत्येकी २५ मतपत्रिकांचे गठ्ठे तयार केले जातील. प्रत्येक टेबलवर एक हजार मतपत्रिका सविस्तर मोजणीसाठी दिल्या जातील. अशा एकूण १३ फेऱ्या होतील. यापूर्वी २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत ३५ उमेदवार असताना, मतमोजणी प्रक्रियेला २३ तास लागले होते.