![]()
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजपचे नवनिर्वाचित आमदार कौस्तुभ गावडे यांनी शिक्षकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. या विजयामुळे प्रचारादरम्यान झालेल्या आरोप-प्रत्यारोपांना उत्तर मिळाले असून, शिक्षकांनी दाखवलेल्या विश्वासाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात गावडे यांनी शिवसेनेचे समर्थित उमेदवार सचिन सानप यांच्यावर मात केली. या निवडणुकीत विद्यमान आमदार जयंत आसगावकर आणि माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. गावडे यांच्या विजयामुळे महायुतीतील भाजपने शिक्षक मतदारसंघात बाजी मारली. विजयानंतर बोलताना गावडे यांनी शिक्षकांचा विश्वास ही आपल्यासाठी महत्त्वाची बाब असल्याचे अधोरेखित केले. प्रचारादरम्यान आपल्या वयावरून झालेल्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. सर्व आरोप-प्रत्यारोपांना पूर्णविराम मिळाला असून, या विजयातून मतदारांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याचे त्यांनी नमूद केले. विरोधकांच्या कोणतेही टीकेला मी प्रत्युत्तर देणार नाही असे देखील त्यांनी नमूद केले. शिक्षक मतदारसंघात पाच जिल्ह्यांतील शिक्षकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यामुळे शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, शिक्षण क्षेत्रातील अडचणी आणि शिक्षकांच्या हक्कांशी संबंधित मुद्दे विधान परिषदेत मांडण्याची जबाबदारी आता गावडे यांच्यावर असेल. निवडणुकीतील विजयाचे रूपांतर शिक्षकांच्या प्रश्नांवरील ठोस कामात कसे होते, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले राजकीय पार्श्वभूमी नसताना यश कौस्तुभ गावडे यांचे वडील मुरलीधर गावडे म्हणाले, शिक्षकांसाठी जी कामे कौस्तुभ याने मांडलेली आहेत ती पूर्ण करण्याचा प्रयत्न तो आगामी काळात करेल. आज त्याचे यश पाहण्यासाठी त्याची आई पाहिजे होती. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आज त्यानी विजय संपादित केला आहे. सर्व शिक्षकांनी त्यास जे जबाबदारीने मतदान केले आहे त्याची जाण आगामी काळात तो ठेवेल. हेही वाचा.. मराठवाडा पदवीधरमध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील 13 हजार मतांनी आघाडीवर:राज्यातील पाच विधान परिषद निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट; महायुतीला तीन, तर मविआ’ची दोन जागांवर आघाडी
राज्यात झालेल्या पाच विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाचे चित्र आज दुपारी स्पष्ट झाले. महाविकास आघाडीने दोन, तर महायुतीच्या तीन जागांवर आघाडीवर आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात आणि पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे. तर अमरावती शिक्षक मतदारसंघात एकनाथ शिंदे शिवसेना आघाडीवर आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आघाडीवर आहे. सविस्तर वाचा
Source link
कौस्तुभ गावडे पुणे शिक्षक मतदारसंघातून विजयी:शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न विधान परिषदेत मांडणार, वडील मुरलीधर गावडेंची प्रतिक्रिया