Headlines

विधान परिषद निकाल:सतीश चव्हाणांचा 18 वर्षांचा गड का ढासळला? मतदारांचा रोष आणि बंडखोरीने कसे फिरवले विजयाचे गणित? 5 जागांचे सविस्तर विश्लेषण




विधान परिषदेच्या पाचही जागांचे निकाल जाहीर झाले. त्यात पुणे पदवीधरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या हर्षदा देशमुख-जाधव, पुणे शिक्षक – भाजपचे कौस्तुभ गावडे, अमरावतीत शिवसेनेचे सरनाईक, नागपूर पदवीधरमध्ये काँग्रेसचे वंजारी आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रतापसिंह पाटील १८,१२४ मतांनी विजयी झाले. पहिल्या पसंतीचा कोटा गाठण्यात एकाही उमेदवाराला यश नाही मराठवाडा पदवीधरमध्ये विजयासाठी आवश्यक ८८,५५८ मतांचा कोटा गाठता न आल्याने दुसऱ्या पसंतीची मतमोजणी बुधवारी सकाळी सुरू झाली. रात्री उशिरा जाहीर आकडेवारीनुसार ३९ व्या फेरीअखेर डॉ. प्रतापसिंह पाटील यांना ८५, ८७६ मते मिळाली. तर महायुती-राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार सतीश चव्हाण यांना ६७, ७५२ मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार रविराज साबळे यांची दुसऱ्या पसंतीची ६,४६९ मते प्रतापसिंह पाटील यांना मिळाली. तर ३, २४१ मते सतीश चव्हाण यांना मिळाली. उद्धवसेनेचे घुगे यांची दुसऱ्या पसंतीची २२८५ मते पाटील यांना तर १८८१ मते चव्हाण यांना मिळाली. प्रतापसिंह पाटील यांना विजयी मताधिक्य मिळताच मतमाेजणी केंद्राबाहेर त्यांच्या समर्थकांनी विजयी जल्लोष केला. १६५४० पदवीधर मतदान करण्यात नापास २३ ऑक्टोबर रोजी मराठवाडा पदवीधरसाठी मतदान झाले. त्यात १ लाख ९३ हजार ६५५ मतदारांनी मतदान केले. यामध्ये १ लाख ७७ हजार ११५ मतदान वैध ठरले. तर तब्बल १६ हजार ५४० मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आलेला नाही. त्यामुळे पदवीधर असलेले मतदार मतदान करण्यात नापास झाले आहेत. या वेळी महायुतीतर्फे उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपकडून मोठी मोर्चेबांधणी झाली होती. मात्र, महायुतीचे तीन प्रमुख नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी एकत्रित बैठकीद्वारे निर्णय घेतला. त्यात ३ वेळा आमदार राहिलेल्या सतीश चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. मतपत्रिकांवर लिहून मतदारांनी व्यक्त केली नाराजी या निवडणुकीत ४१ उमेदवार रिंगणात उतरले होते. या मतदारसंघात मतपत्रिकांवर आपली नाराजी मतदारांनी लिहून व्यक्त केल्याचे आढळले. त्यात प्रामुख्याने ‘कोणीही निवडून येऊ द्या, घर आपलेच भरणार’, ‘असला आमदार नको गं बाई’, ‘सतीश इट्स डन ब्रो’ ‘नो पेन्शन नो वोटिंग’ ‘किती वेळा संधी दिली तरी विकास नाहीच’, ‘पदवी घेतली, पश्चात्ताप झाला’ अशी मत नोंदणी लक्षवेधी ठरली. त्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मविआ 3, महायुती २ : पुणे शिक्षकची जागा भाजपने खेचली, अमरावती शिंदेसेनेने तर पुणे पदवीधर शरद पवार गटाने राखली विश्लेषण: जागा शरद पवारांकडे कायम; डॉ. पाटलांच्या विजयाने भाकरी फिरली मित्रपक्षांकडून आखडता हात अन् सत्तेसाठी पक्षबदलाचे राजकारण चव्हाण यांना भोवले मराठवाडा पदवीधर मतदारसंघात १८ वर्षे एकहाती वर्चस्व गाजवणाऱ्या आमदार सतीश चव्हाण यांच्या राजकीय सोयीच्या राजकारणाचा पदवीधरांनी अखेर ‘करेक्ट’ कार्यक्रम केला. ‘विजय खिशातच आहे’ या आत्मविश्वासात वावरणाऱ्या चव्हाणांचा बुरूज ऐनवेळी रिंगणात उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी कोणतीही पूर्वतयारी नसताना भुईसपाट केला. राजकारणात वेळोवेळी घेतलेल्या सोयीच्या भूमिका, मतदारांची उपेक्षा आणि अंतर्गत दगाफटका हे चव्हाण यांच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले. चव्हाणांकडून पुरोगामी मते दुरावली; डॉ. पाटलांच्या पाठीशी ‘मविआ’ची ताकद सतीश चव्हाण यांच्या पराभवाची कारणे डॉ. पाटील यांच्या विजयाची गणिते ही निवडणूक पाटील विरुद्ध चव्हाण नसून पदवीधर विरुद्ध सतीश चव्हाण अशीच झाली. मतदारांनी आक्रमकपणे बदल घडवला. ४१ उमेदवार, पसंतीक्रमाच्या प्रक्रियेमुळे पदवीधरची मोजणी ४० तासांवर लांबली २०२० मध्ये पहिल्या पसंतीत कोटा पूर्ण केल्याने १८ तासांत जाहीर केला होता निकाल निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले ४१ उमेदवार, त्यामुळे लांबलचक मतपत्रिका, ३ घड्या असलेली मतपत्रिका उघडून पसंतीक्रमाचा शोध, उमेदवारांच्या एजंटांना मत दाखवणे, बाद मतांचा निर्णय सकारण सांगणे आणि उमेदवाराने कोटा पूर्ण न केल्यामुळे दुसऱ्या पसंतीक्रमांची मोजणी आदी कारणांमुळे विधान परिषदेच्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी ४० तासांपेक्षा जास्त लांबली. विशेष म्हणजे २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीची मतमोजणी १८ तास चालली होती. मध्यरात्री २ वाजता निकाल जाहीर करण्यात आला होता. मतपत्रिकांचा अवाढव्य आकार या निवडणुकीत तब्बल ४१ उमेदवार नशीब आजमावत असल्याने मतपत्रिकेचा आकार अतिशय मोठा आणि लांबलचक झाला होता. मतपेटीत बसवण्यासाठी प्रत्येक मतपत्रिकेच्या तीन घड्या घालण्यात आल्या होत्या. प्रत्येक मतपत्रिकेची घडी उघडून ४१ उमेदवारांच्या यादीतून मतदाराने नेमकी कुणाला पहिली पसंती दिली आहे हे शोधून काढण्यातच मोजणी कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा वेळ खर्च झाला. ही सर्व प्रक्रिया वेळखाऊ होती. नागपूर: ३८ उमेदवारांच्या लढतीमध्ये कराळे मास्तरांनी दिग्गजांचे गणित हुकवले ‘कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है… और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं!’ नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीदरम्यान या प्रसिद्ध फिल्मी डायलॉगची आठवण व्हावी अशीच परिस्थिती निर्माण झाली. निवडणूक होती भाजपचे सुधाकर कोहळे अन् महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी यांच्यातील. पण मतमोजणीच्या पटावर सर्वाधिक चर्चेत राहिले ते अपक्ष नितेश कराळे मास्तर. विजयाचा गुलाल उधळण्याची संधी त्यांना मिळाली नाही, मात्र दोन्ही प्रमुख उमेदवारांची धाकधूक वाढवण्याची ताकद त्यांनी दाखवली. पहिल्या पसंतीच्या पहिल्या फेरीत वंजारी यांना २८,९९८, कोहळे यांना २८,०७१, तर कराळे यांना १४,७०८ मते मिळाली. वंजारींची आघाडी अवघी ९२७ मतांची होती. दुसऱ्या फेरीअखेर चित्र पालटले. कोहळे ६०,९२४ मतांसह पुढे गेले, तर वंजारी यांना ५६,६३० मते मिळाली. कोहळेंची आघाडी ४,२९४ मतांवर पोहोचली. कराळेंच्या खात्यात २४,२४९ मते जमा झाली. ————- हेही वाचा.. MLC निवडणूक- पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपचे कौस्तुभ गावडे विजयी:अमरावतीत शिवसेनेचे किरण सरनाईक विजयी; नागपूरमध्ये काँग्रेसचे अभिजित वंजारी विजयी
राज्यात झालेल्या विधान परिषदेच्या 5 मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीने पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघांत विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख-जाधव या पुणे पदवीधर मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी भाजपच्या सुधाकर कोहळे यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *