Headlines

राहुल गांधी आमचे सर्वांत मोठे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर:त्यांनी पॅकअप करून परदेशात जावे; नितेश राणेंची काँग्रेसवर टीका, म्हणाले- जनतेचा मोदींवर विश्वास




मुंबईतील ससून डॉक येथे मच्छिमारांच्या एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी काँग्रेस, राहुल गांधी आणि अभिनेता नसरुद्दीन शाह यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच, मच्छिमार समाजाच्या कल्याणासाठी राज्यातील सरकार कशा प्रकारे काम करत आहे, याची माहितीही त्यांनी दिली. ठाण्यातील हत्याकांड आणि ईव्हीएम-बॅलेट पेपरच्या मुद्द्यावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘मच्छिमारांना आर्थिक आणि आरोग्याचा आधार देवाभाऊंचे सरकार देतेय’ ससून डॉक येथील मच्छिमार महिलांच्या प्रश्नांवर बोलताना राणे म्हणाले, “मासे किंवा कोलम्या सोलत असताना मच्छिमार माता-भगिनींच्या नखांना दुखापत होते किंवा नखं बाद होतात. याचा अभ्यास मत्स्य खात्याने केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत आज आम्ही या महिलांना विशेष किट देत आहोत, जेणेकरून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. गेल्या दोन वर्षांत मच्छिमारांना कृषीचा दर्जा देण्यापासून ते त्यांना आर्थिक सक्षम करण्यापर्यंतची सर्व कामे आमच्या देवाभाऊंच्या सरकारने शब्दापलीकडे कृतीतून करून दाखवली आहेत.” ‘राहुल गांधींनी पॅकअप करून परदेशात जावे’ काँग्रेसच्या कामगिरीवर बोलताना राणे यांनी राहुल गांधींवर टीका केली.”काँग्रेस नेहमीच झिरो होती आणि राहील. ते कधीच हिरो बनू शकत नाहीत. राहुल गांधी हे तर आमचे सर्वांत मोठे ‘ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ आहेत. ते जितकी नौटंकी करतील आणि रस्त्यावर बसून तमाशा करतील, तितकी देशाची जनता पंतप्रधान मोदींसोबत अधिक जोडली जाईल. जनतेचा मोदींवर विश्वास आहे, त्यामुळे राहुल गांधींनी आता पॅकअप करून कुठल्यातरी दुसऱ्या देशात निघून जावे,” असा टोला त्यांनी लगावला. ‘ईव्हीएम असो वा बॅलेट, निकाल एनडीएच्याच बाजूने’ राणे म्हणाले, लोकांच्या हृदयात मोदीजी आणि एनडीए सरकार आहे. त्यामुळे निवडणूक ईव्हीएमवर घ्या किंवा बॅलेट पेपरवर, निकाल तेच येणार आहेत. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून २४ तास जनतेची सेवा करतो, विरोधकांनी रडण्यापेक्षा अशी सेवा करावी, मग त्यांनाही चांगले निकाल मिळतील.” ‘नसरुद्दीन शाह हे दिमागी नक्षल’ अभिनेता नसरुद्दीन शाह यांनी केलेल्या काही विधानांवरून राणे यांनी त्यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली. “नसरुद्दीन शाह हे एक ‘दिमागी नक्षल’ आहेत. पाकिस्तानची स्क्रिप्ट वाचण्यासाठी त्यांना पगार दिला जातो. आता त्यांना चित्रपटात काही काम उरलेले नाही. ते दिवसातले किती तास शुद्धीत असतात हे आधी तपासा आणि मग त्यांना गांभीर्याने घ्या,” असे विधान राणे यांनी केले. सारा अली खानच्या मंदिर दर्शनाचे स्वागत अभिनेत्री सारा अली खान हिने नुकतीच एका हिंदू मंदिराला भेट दिल्याच्या प्रश्नावर राणे म्हणाले, “जर कुणी हिंदूंच्या मंदिरात येत असेल, तर त्याचे स्वागतच झाले पाहिजे. सनातन हिंदू धर्म खूप विशाल आहे, जिथे अशा प्रकारे सर्वांना प्रवेश आणि स्वागत दिले जाते. इतर धर्मांमध्ये अशी परवानगी नसते.” —————– हेही वाचा.. विधान परिषद निकाल: सतीश चव्हाणांचा 18 वर्षांचा गड का ढासळला? मतदारांचा रोष अन् रीलस्टार साबळे, कराळे मास्तरांनी कसे फिरवले विजयाचे गणित? 5 जागांचे सविस्तर विश्लेषण
विधान परिषदेच्या पाचही जागांचे निकाल जाहीर झाले. त्यात पुणे पदवीधरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या हर्षदा देशमुख-जाधव, पुणे शिक्षक – भाजपचे कौस्तुभ गावडे, अमरावतीत शिवसेनेचे सरनाईक, नागपूर पदवीधरमध्ये काँग्रेसचे वंजारी आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रतापसिंह पाटील १८,१२४ मतांनी विजयी झाले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *