Headlines

बहुचर्चित केतन अग्रवाल खटल्याची न्यायालयात पहिली सुनावणी पार पडली:तिसऱ्या आरोपीला वकील नेमण्याचे निर्देश, 17 नोव्हेंबरला पुढील सुनावणी




बहुचर्चित केतन अग्रवाल खटल्याच्या सुनावणीला अखेर सुरुवात झाली आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात उपस्थित राहून खटल्याची सुनावणी सुरू करण्याची विनंती केली. तसेच तीन आरोपींविरोधात सरकार पक्षाकडे कोणते पुरावे आहेत आणि कोणत्या कागदपत्रांच्या आधारे खटला चालवला जाणार आहे, याची सविस्तर जंत्री न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, न्यायालयानेही आरोपींविरोधात आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. खटल्याच्या पहिल्याच सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी जामीन मिळावा आणि आरोपींना खटल्यातून मुक्त करण्यात यावे, अशी मागणी करणारे अर्ज न्यायालयात दाखल केले. आरोपींच्या वतीने जामीन अर्जासह डिस्चार्ज अर्जही सादर करण्यात आला. या अर्जांवर सरकार पक्षाची भूमिका स्पष्ट करताना उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाला सांगितले की, सरकार पक्षाचा नेमका खटला काय आहे, आरोपींविरोधात कोणते पुरावे आहेत आणि कोणत्या कागदपत्रांच्या आधारे आरोप सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, याची संपूर्ण माहिती न्यायालयासमोर येणे आवश्यक आहे. सरकार पक्षाकडून पुराव्यांची आणि संबंधित कागदपत्रांची जंत्री सादर केल्यानंतरच आरोपींच्या जामीन अर्जावर विचार करणे योग्य ठरेल, अशी भूमिका निकम यांनी मांडली. त्यामुळे या अर्जांवरील सुनावणी पुढील तारखेला होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या आरोपीला वकील नेमण्याचे न्यायालयाचे निर्देश या खटल्यातील तिसरा आरोपी रितेश याने अद्याप स्वतःचा वकील नियुक्त केला नव्हता. त्यामुळे न्यायालयाने त्याला पुढील सुनावणीपूर्वी वकील नेमण्याचे स्पष्ट निर्देश दिले. पुढील तारखेपर्यंत वकील नियुक्त न केल्यास न्यायालयाकडूनच त्याला वकील उपलब्ध करून दिला जाईल, असे न्यायालयाने सांगितले. यावर तिसऱ्या आरोपीने आपण स्वतंत्र वकील नियुक्त करणार असल्याचे न्यायालयाला सांगितले. मात्र, न्यायालयाने याप्रकरणी त्याला शेवटची संधी देत पुढील सुनावणीपूर्वी वकील नेमण्याचे निर्देश दिले. 17 नोव्हेंबरला जामीन आणि डिस्चार्ज अर्जावर सुनावणी दरम्यान, न्यायालयाने या खटल्याच्या पुढील सुनावणीची तारीख 17 नोव्हेंबर निश्चित केली आहे. या दिवशी सरकार पक्षाकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे. तसेच आरोपींच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्ज आणि डिस्चार्ज अर्जावरही सुनावणी होणार आहे. त्यामुळे पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने खटला पुढे चालवण्याची तयारी दर्शवली असून, आरोपींविरोधातील पुरावे आणि कागदपत्रांची माहिती न्यायालयासमोर मांडण्याची भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, आरोपींच्या वकिलांनी जामीन आणि खटल्यातून मुक्त करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता 17 नोव्हेंबरच्या सुनावणीत न्यायालय कोणती भूमिका घेते आणि आरोपींच्या अर्जांवर काय निर्णय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हेही वाचा… शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले तर संपूर्ण प्रॉपर्टी सोडून देतो!:सदावर्तेंनी असं लिहून देण्याचं धाडस दाखवावं, निलेश राणेंचे थेट आव्हान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आगामी काळात पुन्हा कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असा दावा करत शिंदे सेनेवर तोफ डागणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना शिवसेना (शिंदे गट) नेते तथा आमदार निलेश राणे यांनी थेट संपत्ती पणाला लावण्याचे ओपन चॅलेंज दिले आहे. “भविष्यवाणी सांगून महाराष्ट्र चालत नाही. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले नाहीत तर मी माझी संपूर्ण प्रॉपर्टी सोडून देईन, असा स्टॅम्प पेपरवर करार करून लिहून देण्याचे धाडस गुणरत्न सदावर्ते दाखवणार का?” असा थेट सवाल आमदार निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे. या अटीतटीच्या आव्हानामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून सदावर्ते हे आव्हान स्वीकारतात का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *