![]()
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर तोळ्यामागे तब्बल ३ हजार २९६ रुपयांनी पडले. त्यामुळे सोन्याचा दर १ लाख ४२ हजार १४० रुपये प्रतितोळ्यावर आला आहे. दुसर
.
अशी झाली सोन्याच्या दरात चढ-उतार
२९ जानेवारी २०२६ १,८७,४६० २८ फेब्रुवारी २०२६ १,७५,९२४ २ मार्च २०२६ १,७३,५५५ १८ एप्रिल २०२६ १,५८,००२ २५ मे २०२६ १,६२,९४६ २२ जून २०२६ १,५१,९२५ २३ जुलै २०२६ १,४९,२४७ २५ ऑगस्ट २०२६ १,६७,१६९ ३० सप्टेंबर २०२६ १,५३,६७६ ३१ ऑक्टोबर २०२६ १,४२,१४०
सोन्याच्या दरावर दबाव निर्माण झाला
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोन्याच्या दरावर दबाव निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर स्थिर ठेवले असले, तरी महागाईमुळे डिसेंबरमध्ये व्याजदर वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याशिवाय अमेरिकन डॉलर आणि सरकारी रोख्यांचा परतावा वाढल्याने गुंतवणूकदारांचा कल सोन्याऐवजी रोख्यांकडे वळला आहे.