Headlines

हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालय बॉम्बने उडवण्याची धमकी:ई-मेल मिळताच पोलिस, बीडीडीएस पथकाकडून 3 तासांपासून शोधमोहीम सुरू




हिंगोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत बाँम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल आज सकाळी न्यायालयाच्या पोर्टलवर पाठविण्यात आला. मेल पाहताच तातडीने पोलिस विभागाला माहिती देण्यात आली असून मागील तीन तासापासून न्यायालयाच्या परिसरात तपासणी सुरु करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील न्यायालयात दाखल झाले आहेत. न्यायालय परिसरात खळबळ हिंगोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज आज सकाळी सुुरू झाल्यानंतर सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास न्यायालयाच्या पोर्टलवर मेल प्राप्त झाला. यामध्ये न्यायालयाची इमारत बाँम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर या मेलबाबत तातडीने पोलिसांना कळविण्यात आले. त्यावरून गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर, सायबरसेलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत आरसेवार, बीडीडीएसचे उपनिरीक्षक नागरे, सचिन गोरले, अभिजीत हलगे, शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, संजय तोडेवाल, गजानन निर्मले, सुनील अंभोरे, अशोक धामणे यांच्यासह दहशतवाद विरोधी पथक न्यायालयात दाखल झाले आहे. दरम्यान, चार मजली इमारत असलेल्या न्यायालयाच्या प्रत्येक मजल्यावर बीडीडीएस कडून तपासणी केली जात आहे. या शिवाय सायबर सेल विभागाच्या पथकाने सदर मेल कोणी केला तसेच मेल पाठविणाऱ्याची माहिती घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. यामेल मुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनी सदर मेल प्राप्त झाला असून तो मेल नेमका कोणाकडून पाठविण्यात आला याची माहिती घेतली जात असल्याचे स्पष्ट केले. तसेच न्यायालयाच्या इमारतीमध्ये तपासणी मोहिम हाती घेण्यात आल्याचे स्पष्ट केले. ———– हेही वाचा.. पवारांना टाळून राष्ट्रवादीच्या 6 बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शहांसोबत खलबतं: मंत्रिमंडळात माजी मंत्र्याच्या पुनरागमनाची चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षातील बड्या नेत्यांनी वरिष्ठ नेतृत्वाला धक्का देत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी थेट दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची बंद दाराआड भेट घेतली आहे. या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीतून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ या 6 ज्येष्ठ नेत्यांच्या दिल्लीतील या गुप्त बैठकीमुळे पुन्हा एकदा अर्थमंत्रिपद आणि विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला आहे. या बैठकीचा फोटो समोर येताच राजकीय गोटात तर्कवितर्कांना उधाण आले असून, महाराष्ट्राच्या सत्तेत आणि महायुतीच्या अंतर्गत समीकरणांमध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *