![]()
कर्जतमधील वृक्षतोडी प्रकरणामुळे राजकारण तापले आहे. अनेक निसर्गप्रेमी, कलाकार देखील विरोधकांसह मैदानात उतरले आहेत. यात अभिनेते सयाजी शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज नागपूर येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी वृक्षतोडीच्या विरोधात एल्गार केला आहे. तसेच सह्याद्री वाचवण्यासाठी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. सयाजी शिंदे म्हणाले, आजकाल आपण 100 आणि 200 वर्षांची झाडे तोडात आहोत, हा मूर्खपणा आहे. आपण सगळ्यांनी, सर्वसामान्य माणसांनी एक ठरवले पाहिजे की आपण वीज कमी वापरू आणि विजेची गरज कमी करूया. आता काय आहे, आपण आत्ता दिवसा 50 लाइट लावून ठेवतो, आता दिवसा लाइट वापरण्याची पण सवय आणली. कोणत्याही रिसॉर्टमध्ये गेलो की तिथेही दिवसा लाइट सुरू असलेले दिसतात. यावर आपण का नाही बोलत? प्रत्येक माणसाने जागृत राहिले पाहिजे. पुढे बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, आपण सगळ्यांनी एक ठरवले पाहिजे की मी विनाकारण बल्ब नाही लावणार, विना कारण पाणी नाही वापरणार. आपण जागृत होऊया आणि शासनाला सुद्धा जागृत करू. तसेच प्रकल्प आणि त्यावरून रोजगारीचा प्रश्न विचारला असता शिंदे म्हणाले, झाडाला आणि पर्यावरणाला त्रास न देता काय पैसे खा, मरा, कसली प्रगती करायची ते करा. मला त्यात काही देणे घेणे नाही. मला एवढेच वाटते की आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत, त्यामुळे आपल्याला झाडे, पर्यावरण या गोष्टी महत्त्वाच्या असल्या पाहिजेत. शेवटी हा मनाचा खेळ आहे. तुम्हाला किती विकास करायचा ते करा, तुम्ही 500 वर्ष जगणार नाहीत आहात तुम्ही. ज्यावेळी ऑक्सिजन घेता येणार नाही, धन्यवाद कार्यक्रम आहे तुमचा, असेही शिंदे यांनी यावेळी म्हटले. सह्याद्रीच्या जिवावर का उठलात? तसेच आपल्या सह्याद्रीला एवढी शान आहे म्हणत असतो आपण तर त्याच्या जिवावर का उठलो आहोत आपण? याचा विचार केला पाहिजे. शांतपणे विचार केला गेला पाहिजे. महाराष्ट्राला मी विनंती करतो, सगळ्यांनी सह्याद्री वाचवा. तसेच पत्रकारांना आवाहन करताना सयाजी शिंदे म्हणाले, पत्रकार बंधूंनो तुमचे मालक काहीही म्हणू द्या, कितीही ऑब्जेक्शन येऊ तुम्ही देखील इथे या, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. झाडाला कुठलाही जात धर्म नसतो महाराष्ट्रात एकीकडे दुष्काळ असताना दुसरीकडे 32 हजार कोटी रुपये खर्च करून कुंभमेळा आयोजित केला आहे. यावर प्रश्न विचारला असता सयाजी शिंदे म्हणाले, हे बघा त्यात मी काही बोलणार नाही. जगात फक्त झाडाला काही जात पात धर्म नसतो. मुके प्राणी जे आहेत, त्यांच्याकडून आपण आदर्श घेतला पाहिजे. बाकी सगळे मनाचे खेळ आहेत. किती ढोल वाजवायचे आहेत ते त्यांचा प्रश्न आहे. तसेच आईनंतर आपल्याला जगावणारे झाडच आहेत. इतकी सोपी गोष्ट आहे. झाडांना त्रास न देता प्रगती केली पाहिजे.
Source link
कर्जतमधील वृक्षतोडीवर सयाजी शिंदेंचा नागपुरात एल्गार:सह्याद्रीची एवढी शान आहे, तर त्याच्या जिवावर का उठलात? शिंदेंचा सवाल