Headlines

अजिंठा घाटात 3 वाहने बंद पडल्याने 4 तास वाहतूक ठप्प:तीन किमी रांगा, रविवारी रात्री 10 वाजेची घटना, पहाटे 2 वाजता वाहतूक सुरू




अजिंठा घाटात रविवारी रात्री १० वाजता तीन वाहने बंद पडल्यामुळे चार तास वाहतूक ठप्प झाली होती. रात्री १० च्या सुमारास बंद पडलेली वाहतूक यंत्रणा अथक प्रयत्नांनंतर रविवारी मध्यरात्री २ वाजता पूर्ववत करण्यात यश आले. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये सात वेळा वाहतूक ठप्प झाल्याने अजिंठा लेणीकडे दररोज येणाऱ्या ५ हजार पर्यटकांची संख्या ५०० वर येऊन ठेपली आहे. त्यामुळे प्रशासनाने घाटातील कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना राबवण्याची मागणी होत आहे. घाटात रविवारी रात्री तीन गाड्या बंद पडल्या, ज्यामध्ये एका क्रूझर गाडीचा आणि एका ट्रकचा किरकोळ अपघातही झाला. यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक चार तास ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक पवन इंगळे, हवालदार सांडू जाधव, संजय कोळी, होमगार्ड नेरपगारे, गावडे, सनान्से, घन, इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेत परिश्रम करून वाहतूक सुरळीत केली. वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीचा थेट फटका अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना बसत आहे. दिनांक कारण कोंडीचा वेळ ८ मे बस-ट्रकची धडक ४ तास १० मे ॲपेचा अपघात १ तास १ जून दोन ट्रकची धडक ३ तास ११ सप्टेंबर दोन अपघात १ तास ३ ऑक्टोबर तीन ट्रक बंद ७ तास १० ऑक्टोबर तीन वाहने बंद ३ तास १२ ऑक्टोबर तीन ट्रकची धडक ४ तास १६ ऑक्टोबर ट्रकची ट्रॉलीला धडक १० तास २५ ऑक्टोबर ट्रॅव्हल्स-ट्रक धडक २ तास २६ ऑक्टोबर तीन ट्रक बंद १४ तास १ नोव्हेंबर तीन वाहने बंद ४ तास घाटातील रस्ता पूर्वी ४० फुटांचा होता. मात्र नाल्यांची कामे आणि मोठे संरक्षण कठडे उभारल्याने रस्ता काही ठिकाणी अरुंद झाला आहे. घाटातील १० किमीच्या महामार्गावर ७ ठिकाणी अरुंद रस्ते व वळणे असल्याने अवजड वाहने बंद पडून अपघात होतात. अपघात रोखण्यासाठी फायबरचे ब्रेकर आवश्यक आहेत. सागर कळम, कनिष्ठ अभियंता, सा.बां. विभाग सात ठिकाणी अरुंद रस्ते ५ महिन्यांत ११ वेळा अजिंठा घाट ठप्प



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *