Headlines

Aditya Thackeray Slams Mumbai Mayor; Dia Mirza Controversy & Farmer Issues


मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) पर्यावरणपूरक दिवाळी जनजागृती मोहिमेतील अभिनेत्री दिया मिर्झाच्या व्हिडीओवर भाजप आणि महापौर रितू तावडे यांनी घेतलेल्या आक्षेपावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठव

.

उच्च न्यायालयाने याप्रकरणी प्रशासनाला फटकारल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी दिया मिर्झा प्रकरणासह राज्यातील दुष्काळ, शेतकऱ्यांची दुरवस्था आणि महापालिकेतील आर्थिक उधळपट्टीवर थेट बोट ठेवले.

बीएमसीने स्वतः पत्र लिहून व्हिडिओ मागवले, आता जोकरसारखं फिरवताय

दिया मिर्झाच्या व्हिडीओवरून सुरू असलेल्या राजकीय वादावर संताप व्यक्त करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “दिया मिर्झा, अजिंक्य रहाणे, माधुरी दीक्षित या सर्व कलाकारांना महापालिकेने स्वतः अधिकृत पत्र लिहून दिवाळीत प्रदूषण टाळण्यासाठी जनजागृतीपर व्हिडीओ बनवून पाठवण्याची विनंती केली होती. ते पत्र मी स्वतः पाहिले आहे. मग आता स्वतःच्याच पत्रावरून पळ काढत ‘मला माहितीच नाही’ असा बनाव करणे ही शुद्ध जोकरबाजी आहे.”

महापौरांच्या विसंगतींचा पाढा

“महापौरांना स्वतःच्या गाडीवर लाल दिवा हवा असतो, नंतर मीडियात आले की म्हणतात ‘मी नाही मागितला’. घराच्या नूतनीकरणावर तब्बल 5 कोटी रुपये खर्च करायचे ठरवतात, पेपरमध्ये बातम्या आल्यावर ‘मला ठाऊकच नाही’ म्हणतात. सोशल मीडिया हँडलवर कोट्यवधी रुपये उधळण्याचा प्रस्ताव येतो आणि विरोध झाल्यावर हात वर करतात. आता तुमच्याच कार्यालयातून पत्र गेले असताना महापौरांना माहिती नाही, मग नेमकं हे शहर चालवतंय तरी कोण?”

जाती-धर्माचे घाणेरडे राजकारण

“दिवाळीत फटाके न फोडण्याचे आवाहन करणे हा गुन्हा कसा ठरतो? कोर्टाने प्रशासनाला झापले असून तो व्हिडीओ पुन्हा अपलोड करण्याचे निर्देश दिले आहेत. शहराचे मूलभूत प्रश्न सोडून फक्त जातीय द्वेष पसरवणे हेच भाजपचे काम उरले आहे.”

कुंभमेळ्याच्या हेलिपॅडवर कोट्यवधींची उधळपट्टी

राज्यातील दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटावरून आदित्य ठाकरे यांनी मिंधे-भाजप सरकारवर आसूड ओढला. “दिवाळी तोंडावर आली तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही. मागच्या वर्षाची नुकसानभरपाई अजून मिळालेली नाही, कर्जमाफीचा पत्ता नाही आणि आता केवळ 5,000 रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर केली आहे; तीही अजून कोणाच्या हातात पडलेली नाही.”

इव्हेंटबाजीवर उधळपट्टी

“सिंहस्थ कुंभमेळ्याच्या इव्हेंटसाठी आणि हेलिपॅड बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये एका रात्रीत उडवले जातात, मग ज्या अन्नदात्याच्या बळावर देश जगतो, त्या बळीराजाच्या बांधावर मदत देण्यासाठी सरकारच्या तिजोरीत खडखडाट का? हा दुटप्पीपणा जनतेला स्पष्ट दिसत आहे.”

महाराष्ट्रातील 265 तालुक्यांत दुष्काळाची भीषणता

राज्यातील दुष्काळाची भीषण आकडेवारी मांडत त्यांनी सरकारला धारेवर धरले. “आज राज्यातील तब्बल 265 तालुक्यांमध्ये अत्यंत भीषण दुष्काळ जाहीर झालेला आहे. निसर्गरम्य आणि पावसाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या महाबळेश्वरसारख्या डोंगराळ तालुक्यातही पिण्याच्या पाण्याचे आणि दुष्काळाचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे.”

खाजगी सावकारांचा फास अन् बँकांच्या नोटिसा

“कर्जमाफी जाहीर होण्यापूर्वी अनेक शेतकऱ्यांनी जमिनी वाचवण्यासाठी खाजगी सावकारांकडून चढ्या व्याजाने कर्जे काढून वन टाईम सेटलमेंट (OTS) केली. मात्र आता बँका त्याच शेतकऱ्यांना नवे पीककर्ज देण्यास नकार देत आहेत आणि वसुलीच्या जप्ती नोटिसा पाठवत आहेत. बँकांकडून सुरू असलेला हा छळ थांबवण्याची ताकद या सरकारमध्ये उरलेली नाही.”

भाजप घाणेरड्या राजकारणात मस्त

आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “ज्यांचा कोणी आवाज नाही त्यांना आवाज देणे, अन्यायाविरोधात लढणे आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सावरणे हाच आमचा खरा धर्म आहे. आमचे खासदार, नगरसेवक आणि कार्यकर्ते स्वतःच्या बळावर शेतकऱ्यांच्या बांधावर उभे आहेत. ज्यांचे युनोच्या (UN) शिष्टमंडळात नाव होते, ते आज थेट शेतात जाऊन बळीराजाचे अश्रू पुसत आहेत.”

12 वर्षांत देशाला काय दिले?

“भाजप केवळ धर्मा-धर्मात भांडणे लावून घाणेरड्या राजकारणात मग्न आहे. ज्यांना मुंबईसारखे महापालिका शहर सांभाळता आले नाही, त्यांनी गेल्या 12 वर्षांत संपूर्ण देशाचे वाटोळे केले आहे. महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या वाढवण्यापलीकडे या सरकारने काहीही केलेले नाही,” असा थेट हल्लाबोल त्यांनी शेवटी केला.

——————————————-

हेही वाचा…

दिया मिर्झाचा दिवाळीचा व्हिडिओ हटवल्याने हायकोर्ट नाराज: म्हटले- भारत धर्मनिरपेक्ष देश; BMC ला पुन्हा अपलोड करण्याचे आदेश; भाजप नेत्यांनी घेतला होता आक्षेप

मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्री दिया मिर्झाने दिवाळीत फटाके न वाजवण्याचे आवाहन करणारा व्हिडिओ हटवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने म्हटले की, भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि पर्यावरणाशी संबंधित मुद्द्याला कोणताही वेगळा रंग देऊ नये. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने म्हटले की, दिया मिर्झाने न्यायालयाच्या निर्देशांनुसार जनजागृतीचा व्हिडिओ तयार केला होता. काही नेत्यांच्या टिप्पण्या योग्य नव्हत्या. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.