Headlines

शिंदे गटात 3 एकनाथ शिंदे निर्माण झालेत, दोघांचा आम्हालाही संपर्क:संजय राऊतांचा गौप्यस्फोट, गोकुळ व बच्चन यांच्या सुरक्षेवरून सरकारवर घणाघात




राज्यातील महायुती सरकार आणि विशेषतः भाजपवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत चौफेर हल्ला चढवला. गोकुळ दूध संघाची निवडणूक, दिया मिर्झाचे फटाक्यांवरील वक्तव्य, महानायक अमिताभ बच्चन यांची सुरक्षा ते महायुतीतील अंतर्गत वाद अशा सर्वच मुद्द्यांवर राऊत यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत सरकारचा समाचार घेतला. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सध्या तीन गट निर्माण झाले असून, त्यातील दोन नेत्यांनी आम्हाला संपर्क केल्याचा खळबळजनक राजकीय गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे. ‘शिंदे गटात तीन एकनाथ शिंदे’ संजय राऊत म्हणाले, हे दोन्ही पक्ष फार काळ टिकणार नाहीत. सर्वांत आधी अजित पवारांचा पक्ष कोसळेल. तर, शिंदेंच्या पक्षात सध्या अस्वस्थता असून, त्या पक्षात तीन ‘एकनाथ शिंदे’ (तीन गट) निर्माण झाले आहेत. एकाला फडणवीस ताकद देत आहेत, तर दुसऱ्याला अमित शहा. विशेष म्हणजे, त्यातील दोन शिंदेंनी आम्हालाही संपर्क केला आहे. वातावरण बदलत असल्याचे सांगत ते पश्चात्ताप व्यक्त करत आहेत.” ‘महानायकाला बुलेटप्रुफ पिंजऱ्यात फिरावे लागते, ही राज्याची विटंबना’ अमिताभ बच्चन यांच्या बुलेटप्रुफ काचेच्या सुरक्षेवरून राऊत यांनी राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवले. ते म्हणाले, “महानायक अमिताभ बच्चन यांना बुलेटप्रुफ काचेचा पिंजरा घेऊन दुबळ्या व्यक्तीसारखे बाहेर यावे लागत आहे. टायगर श्रॉफला बिश्नोई गँगची खंडणीची धमकी येते. राज्यात फक्त मोजके नेतेच झेड प्लस सुरक्षा घेऊन सुरक्षित आहेत, बाकी कोणीही सुरक्षित नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना याची लाज वाटायला हवी, पण ते गोकुळच्या राजकारणात बिझी आहेत.” ‘गोकुळ दूध संघ अमूलला विकण्याचा डाव’ गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत ते म्हणाले, “सतेज पाटील यांच्या समविचारी पॅनलने २५ पैकी १३ जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. तरीही देवेंद्र फडणवीस आणि भाजप बहुमताचा अनादर करत आहेत. नवीन कायदा आणून चार तज्ज्ञ संचालक घुसवून गोकुळ संघ ताब्यात घेण्याचा त्यांचा लोकशाहीविरोधी इरादा आहे. त्यांना गोकुळ अमूलच्या घशात घालायचे आहे, पण शेतकऱ्यांनी तो डाव हाणून पाडला.” दिया मिर्झा प्रकरणी भाजपवर निशाणा दिया मिर्झा प्रकरणावर राऊत यांनी टीका केली. दिया मिर्झाने फटाक्यांबाबत पर्यावरणाचा आणि प्रदूषणाचा मुद्दा मांडला. तिने कुठेही हिंदूंनी फटाके वाजू नयेत असे म्हटलेले नाही. पण भाजपचे लोक नेहमीप्रमाणे यात हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करत आहेत. हायकोर्टाने पालिकेला चपराक लावूनही सत्ताधारी महापालिकेला जास्त चरबी आली आहे, ते कोर्टाचा अवमान करत आहेत,” असा घणाघात राऊत यांनी केला. ५ हजार रुपयांच्या मदतीवरून पलटवार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५ हजार रुपये देण्यावरून राऊत म्हणाले, स्वतः मुख्यमंत्री आणि त्यांचे कुटुंबीय काय रिक्षातून फिरतात? त्यांचे मंत्री आणि आमदार ठेकेदारांच्या आलिशान गाड्यांमधून फिरतात. पाच हजार रुपये ही अतिशय तुटपुंजी मदत आहे. जर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असते, तर त्यांनी यावर पाच हजार वेळा तांडव केले असते.” ———————- हेही वाचा.. मनसेकडून यंदाचा दीपोत्सव रद्द, साधेपणाने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन: राज ठाकरे म्हणाले- फटाके, रोषणाईला आवर घाला मुंबईतील शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दरवर्षी अतिशय भव्य आणि दिमाखदार पद्धतीने साजरा होणारा ‘शिवाजी पार्क दीपोत्सव’ यंदा रद्द करण्यात आला आहे. राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेतल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. तसेच, राज्यातील नागरिकांनीही यंदा फटाके आणि रोषणाईला आवर घालून साधेपणाने दिवाळी साजरी करावी, असे भावनिक आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *