![]()
प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२६-२७ साठी पुणे जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे होणाऱ्या पीक नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे. पुणे जिल्ह्यात एच.डी.एफ.सी. एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत ही योजना राबविण्यात येत असून, रब्बी हंगामातील अधिसूचित पिकांसाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांचा विमा हप्ता संरक्षित रकमेच्या १.५ टक्के आहे. गहू बागायतीसाठी प्रति हेक्टर ४५ हजार रुपये, ज्वारी व हरभऱ्यासाठी ३६ हजार रुपये, उन्हाळी भुईमुगासाठी ४० हजार ६०० रुपये आणि रब्बी कांद्यासाठी ९५ हजार रुपये, रब्बी मक्यासाठी 50 हजार रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आली आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्टॅक शेतकरी ओळखपत्र, बँक खाते तपशील, जमीनधारणा उतारा तसेच डिजिटल पीक सर्वेक्षणांतर्गत १०० टक्के पीक नोंदणी बंधनकारक आहे. प्रति अर्ज किमान ०.१० हेक्टर क्षेत्राची अट असून, कर्जदार व बिगरकर्जदार शेतकऱ्यांसाठी योजना ऐच्छिक आहे. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नोंदणीकृत भाडेकरार अपलोड करून सहभागी होता येईल. सन २०२५-२६ मध्ये पुणे जिल्ह्यातील ३ हजार ८६४ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला होता. यंदा दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. ————– हेही वाचा.. हेही वाचा.. पायल झांबरे मृत्यूप्रकरणी सासू-सासऱ्यांना अटक: पती अक्षय आधीच पोलिस कोठडीत; हुंडा, पैसे अन् सोन्यासाठी छळाचा आरोप
आयटी अभियंता पायल झांबरे यांच्या मृत्यूप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी त्यांच्या सासू आणि सासऱ्यांना बुधवारी सकाळी अटक केली. रुग्णालयातून उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात येताच पोलिसांनी ताब्यात घेऊन ही कारवाई केली. पायल यांचे पती अक्षय अरविंद झांबरे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. सविस्तर वाचा
Source link
पुणे जिल्ह्यात रब्बी पीक विमा योजना लागू:2026-27 हंगामासाठी शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन