Headlines

Manoj Jarange SIT Probe; Demands Audio Clip Source & Security Cover


मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान राजकीय वर्तुळात प्रचंड भूकंप घडवून आणणाऱ्या कथित 500 कोटी रुपयांच्या देवाणघेवाणीच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात आता तपास यंत्रणांनी थेट आक्रमक पावले उचलली आहेत. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी राज्य शासनाने नेमलेली विशेष तपास पथकाच

.

शैलेश बलकवडेंच्या नेतृत्वात त्रिस्तरीय SIT कडून चौकशीला वेग

कथित 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून सत्ताधारी महायुतीमध्येच मोठा अंतर्गत कलगीतुरा रंगल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई पोलीस आयुक्तांना तात्काळ चौकशीचे आदेश दिले होते. मुंबई पोलिसांचे गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली ३ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली त्रिस्तरीय एसआयटी (SIT) गठीत करण्यात आली आहे.

जरांगेंना अधिकृत पत्र

एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना अधिकृत पत्र दिले आहे. पत्रकार परिषदेत ऐकवण्यात आलेल्या संभाषणाची संपूर्ण ऑडिओ क्लिप, तिचा मूळ डेटा आणि डिजिटल पुरावे तपास यंत्रणेकडे सादर करण्याची विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

500 कोटींचा दावा अन् भाजप-शिवसेनेत जुंपली होती

काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एका फोन संभाषणाची ऑडिओ क्लिप ऐकवून खळबळ उडवून दिली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मनोज जरांगे यांना ५०० कोटी रुपये देण्यात आल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला होता.

माझ्या नावाने कोणी पैसे लाटले?

“मला 500 कोटी रुपये दिले असे भासवून भाजप किंवा सत्ताधाऱ्यांकडून कोणी मध्यस्थाने पैसे लाटले का? मला खरंच एक रुपया तरी मिळाला आहे का?” असा सवाल उपस्थित करत जरांगे यांनी यामागील खरा सूत्रधार शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती. या दाव्यानंतर भाजप आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली होती.

सोर्स उघड करेन, पण देणाऱ्याच्या जीवाला धोका नको!

एसआयटीच्या पत्रानंतर माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, मात्र संरक्षणाचा मुद्दा लावून धरला. “मला या प्रकरणाचा पूर्ण सोक्षमोक्ष लावायचा आहे. त्यामुळे एसआयटीला ऑडिओ क्लिप देण्यास माझी कोणतीही हरकत नाही. ही क्लिप माझ्याकडे कुठून आली, कोणामार्फत आली, याचा मूळ सोर्सही मी तपास अधिकाऱ्यांना सांगेन.”

सत्ताधाऱ्यांवर अटींची जबाबदारी

“पण सर्वात महत्त्वाची अट ही आहे की, ज्या व्यक्तीने हे धाडस करून हा ऑडिओ समोर आणला, त्याच्या जीविताचे रक्षण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घ्यावी. त्याला अथवा त्याच्या कुटुंबाला काहीही होणार नाही, याची पक्की खात्री सरकारने दिली पाहिजे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून 500 कोटींचा खेळखंडोबा करणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा बुरखा टराटरा फाडलाच पाहिजे,” असा पुनरुच्चार जरांगे यांनी केला.

आता एसआयटी या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी कशी करणार आणि जरांगे पाटील नेमका कोणाचा पर्दाफाश करणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

——————————————-

हेही वाचा…

बसमध्ये काँग्रेसच्या महिला खासदाराला चापट?:व्हिडीओ व्हायरल होताच टीकेची झोड; बर्वे म्हणाले- बहिणीशी थट्टा चालली होती; धानोरकर म्हणाल्या- बदनामी चुकीची

काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील आंदोलनादरम्यान आंदोलक खासदारांना घेऊन जाणाऱ्या बसमधील एका व्हिडिओवरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये रामटेकचे काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे हे चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गालावर हात लावताना (हलकी चापट मारताना) दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसच्याच काही कथित पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे थेट ईमेलद्वारे तक्रार दाखल केली. या वर्तनामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचा दावा करत शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी करण्यात आली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.