![]()
पुण्यातील बहुचर्चित आंदेकर टोळीशी संबंधित खटल्यात उच्च न्यायालयाने लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांना जामीन मंजूर केला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे, या आदेशाला चार आठवड्यांची स्थगिती देण्याची विशेष सरकारी वकील ॲड. शिशिर हिरे यांची मागणीही न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे आंदेकर कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. त्यांच्या वतीने ॲड. विपुल दुशिंग यांनी न्यायालयात बाजू मांडली. सुनावणीदरम्यान आंदेकर यांचा संबंधित गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट होत नसल्याचा मुद्दा बचाव पक्षाने मांडला. तसेच उपलब्ध बाबींच्या आधारे त्यांचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध होत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर विशेष सरकारी वकील ॲड. शिशिर हिरे यांनी या आदेशाच्या अंमलबजावणीला चार आठवड्यांची स्थगिती देण्याची विनंती केली. मात्र, ॲड. विपुल दुशिंग यांनी या मागणीला विरोध केला. त्यांनी बचाव पक्षाची भूमिका पुन्हा स्पष्ट करत लक्ष्मी आंदेकर यांचा गुन्ह्यातील सहभाग नसल्याचे मुद्दे न्यायालयासमोर मांडले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने सरकारी पक्षाची स्थगितीची मागणी फेटाळून लावली आणि जामीन मंजूर करण्याचा आपला आदेश कायम ठेवला. त्यामुळे लक्ष्मी आंदेकर यांच्या जामिनाच्या मार्गातील महत्त्वाचा कायदेशीर अडथळा दूर झाला आहे. या निर्णयामुळे आंदेकर कुटुंबाला दिलासा मिळाला असला, तरी संबंधित गुन्ह्याच्या खटल्यातील पुढील न्यायालयीन प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. ————- हेही वाचा.. गोकुळच्या आखाड्यात आता उद्धव ठाकरे उतरले:सतेज पाटलांना म्हणाले- लढा, आम्ही तुमच्यासोबत; शिंदे गटाची मात्र भाजप-राष्ट्रवादीच्या खेळीवर नाराजीची चर्चा
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या अध्यक्ष निवडीवरून पेटलेल्या राजकीय आखाड्याचे लोण आता थेट राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे. 5.5 लाख (साडेपाच लाख) दूध उत्पादक शेतकऱ्यांचा लोकशाही कौल डावलून राज्य सरकारने गोकुळवर 4 शासननियुक्त (स्वीकृत) संचालक लादण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या संघर्षात आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट उडी घेतली आहे. सतेज पाटील यांच्या मुंबईतील पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना स्वतः फोन करून, “गोकुळ वाचवण्यासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत आहोत,” अशी ग्वाही दिली आहे. सविस्तर वाचा
Source link
आंदेकर टोळीला हायकोर्टाचा दिलासा:लक्ष्मी आंदेकर यांना जामीन मंजूर, सरकारी वकिलांची 4 आठवड्यांची स्थगिती मागणी फेटाळली