![]()
मंत्रालयात सध्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिल राबवण्यात येत आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तसेच मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याच्या उद्देशाने ही मोहीम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालयाच्या प्रशासकीय इमारतीतील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच इमारतीमध्ये उपस्थित असलेल्या सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तातडीने इमारत रिकामी करण्याच्या सूचना सातत्याने दिल्या जात आहेत. यासाठी मंत्रालय परिसरात वारंवार सूचना देण्यात येत असून, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे निर्देश दिले जात आहेत. या संपूर्ण मॉक ड्रिलच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीत मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि इतर उपस्थित व्यक्तींनी कशा प्रकारे प्रतिसाद द्यावा, याची चाचपणी केली जात आहे. तसेच सुरक्षा यंत्रणांची सज्जता, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा आणि इमारत रिकामी करण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेतला जात आहे. मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या प्रशासकीय केंद्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही मॉक ड्रिल महत्त्वाची मानली जात आहे. कोणत्याही संभाव्य धोक्याच्या परिस्थितीत कमीत कमी वेळेत योग्य ती खबरदारी घेता यावी आणि जीवितहानी टाळता यावी, या उद्देशाने ही संपूर्ण मोहीम राबवली जात आहे. हेही वाचा… SRA चे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सरकारचा पुढाकार:शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाला जबाबदारी घेण्याचे एकनाथ शिंदेंचे आदेश मुंबई आणि परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (SRA) रखडलेले पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत. रखडलेल्या काही पुनर्विकास प्रकल्पांची जबाबदारी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाने स्वीकारावी आणि हे प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करावेत, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या रहिवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा….
Source link
मंत्रालयात सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिल:वीजपुरवठा खंडित, अधिकारी-कर्मचाऱ्यांना इमारत रिकामी करण्याच्या सूचना