Headlines

सटाणा-ठेंगोडा मार्गावर खंडित दुभाजकाची दुरुस्ती सुरू:‘दिव्य मराठी’च्या वृत्ताची दखल, आठ किमीच्या टप्प्यातील 45 ठिकाणांची दुरुस्ती होणार


.

साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील सटाणा ते ठेंगोडा दरम्यान खंडित झालेल्या दुभाजकाच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात झाली आहे. गुरुवारी (दि. ५)हे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने १९ ऑक्टोबर रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने वाहनचालक आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

सटाणा ते ठेंगोडा या आठ किलोमीटरच्या अंतरात तब्बल ४५ ठिकाणी दुभाजक खंडित करण्यात आले होते. गावांकडे जाणारे रस्ते, खासगी आस्थापना तसेच शेतांमध्ये जाण्यासाठी अनेक ठिकाणी दुभाजक तोडण्यात आले होते. त्यामुळे महामार्गावर अपघातांचा धोका वाढला होता. विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना खंडित डिव्हायडरचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती.याबाबत ‘दिव्य मराठी’ने १९ ऑक्टोबरच्या वृत्तातून वस्तुस्थिती मांडून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे लक्ष वेधले होते. महामार्गावरील नियमबाह्य दुभाजक कट बंद करून सुरक्षित वाहतुकीसाठी उपाययोजना करण्याची गरजही अधोरेखित केली होती. अखेर प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. महामार्गावरील खंडित दुभाजक बंद करण्याचे काम सुरू झाले असले, तरी सर्व ४५ ठिकाणांची दुरुस्ती पूर्ण करून दुभाजक नियमांनुसार पूर्ववत करणे आवश्यक आहे. भविष्यात अनधिकृतपणे दुभाजक तोडले जाणार नाहीत, यासाठी दक्षता घ्यावी, अशी अपेक्षा वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे. ‘दिव्य मराठी’ने १९ ऑक्टोबरच्या अंकात प्रकाशित केलेले वृत्त .

खंडित दुभाजकाला पुठ्ठा लावून गांधीगिरीच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. खंडित दुभाजक बंद करण्याच्या कामाला सुरुवात झाल्याबद्दल प्रशासनाचे आभार. – राजेंद्र सोनवणे , अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बागलाण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *