Headlines

गोकुळमध्ये लोकशाही टिकवण्यासाठीच शासननियुक्त संचालकांचा निर्णय:आता गोकुळचा विषय संपला; तर सतेज पाटलांनी चेअरमन करावा- हसन मुश्रीफ




गोकुळ दूध संघात निवडून आलेल्या 25 संचालकांना जर सत्ता द्यायची असेल आणि त्यांना काम करू द्यायचे असेल, तर लोकशाही टिकवण्यासाठी आमच्याकडे शासननियुक्त सदस्यांचा निर्णय घेण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही मार्ग नव्हता, असे स्पष्टीकरण राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. तसेच, आमच्या सहकाऱ्यांना विरोधी पक्षात बसण्याचा कौल मिळाला आहे; मग आमचे लोक त्यांचा चेअरमन करण्यासाठी का जातील? कायद्यात 14 सदस्यांच्या कोरमची अट असल्यानेच हा प्रश्न निर्माण झाला आहे. हसन मुश्रीफ म्हणाले की, विरोधकांना बहुमत मिळाले असले तरी त्यांना अपेक्षित 14 चा आकडा गाठता आलेला नाही. नियमानुसार 3 बैठकांना संचालक गैरहजर राहिल्यास तेथे प्रशासक नियुक्त केला जाऊ शकतो. त्यामुळे निवडून आलेल्या 25 लोकांच्या हाती सत्ता देण्यासाठीच सरकारने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कायद्याच्या चौकटीत टिकला नाही किंवा न्यायालयाने तो रद्द केला तरी काय होणार? कोणताही पर्याय शिल्लक नसल्यानेच हा मार्ग स्वीकारावा लागला. त्यामुळे आता सतेज पाटील यांनीच यावर काहीतरी तोडगा काढावा. दरम्यान, माझ्या मुलाबद्दल जो जातीयवादी प्रचार केला गेला, त्याची मला मोठी खंत असून ते माझ्या जिव्हारी लागले आहे. पवारांची प्रकृती बरी हसन मुश्रीफ म्हणाले की, एकदा हा मुद्दा संपला की 25 संचालक एकत्र येऊन सतेज (बंटी) पाटील यांना हवा तसा चांगला कारभार गोकुळमध्ये करतील. याच वेळी मुश्रीफ यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत म्हटले, प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली असून पवारांची प्रकृती आता उत्तम दिसते आहे. त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी आणि त्यांनी शंभर वर्षे महाराष्ट्राची सेवा करावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तसेच, दिवाळीच्या तोंडावर मला आणि माझ्या कुटुंबाला मोठा दिलासा देत न्याय दिल्याबद्दल मी न्यायदेवतेचा ऋणी आहे. गोकुळमध्ये कोरम 14 सदस्यांचा हसन मुश्रीफ म्हणाले की, गोकुळबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे मला ट्रोल केले जात आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे. परंतु, एका विशिष्ट परिस्थितीतच तो निर्णय घ्यावा लागला. गोकुळच्या निवडणुकीत काँग्रेसचे 13 तर महायुतीचे 12 उमेदवार विजयी झाले आहेत, मात्र इथे कोरम 14 सदस्यांचा आहे. त्यामुळे त्यांना 1 तर आम्हाला 2 सदस्य कमी पडत आहेत. शिवसेना नाराज असण्याचा कोणताही प्रश्न नाही, असे आबिटकर यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, धंगेकर काहीतरी बोलत असून त्यांनी पदवीधर निवडणुकीच्या वेळीही अशीच वक्तव्ये केली होती. सतेज पाटलांकडे बहुमत असेल तर त्यांनी अवश्य चेअरमन करावा, आमची त्याला कोणतीही हरकत नाही. आम्ही महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय सर्वांच्या संमतीने घेतला आहे, त्यामुळे आता गोकुळचा विषय संपला आहे. त्या लोकांचीही दिवाळी गोड झाली दरम्यान, राजू शेट्टी यांच्या आंदोलनाबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, पुणे-बंगळुरू महामार्गावरील आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, मार्ग निघाल्याने त्या लोकांचीही दिवाळी गोड झाली, याबद्दल मी राजू शेट्टी यांचे आभार मानतो.
हे ही वृत्त वाचा निदा खान प्रकरण:35 दिवस संभाजीनगरमध्ये ठेवण्यामागे जलील यांचाच हात, त्यांना जेलमध्ये जावेच लागणार- संजय शिरसाट
निदा खान हिला नाशिकमधून पळवून मुंब्रा येथे घेऊन जाणे, तेथून छत्रपती संभाजीनगरमध्ये आणणे आणि जवळपास 35 दिवस तिच्यासह तिच्या नातेवाईकांची राहण्याची व्यवस्था करण्यामागे मुख्य आरोपी इम्तियाज जलील हेच आहेत. त्यांचा जो नगरसेवक आहे, तो केवळ एक मोहरा असून हे सर्व कारस्थान इम्तियाज जलील यांचेच आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, आता त्यांना तुरुंगात जावे लागणार आहे, असा दावा शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केला आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *