![]()
थेरगाव येथे थेरगाव-वडजी रस्त्यावर शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात संतोष योहान आहेर (४५, रा. थेरगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. संतोष आहेर हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शनिवारी पाचोड येथे आपले खासगी काम आटोपून ते दुचाकीवरून थेरगाव येथील आपल्या घरी परतत होते. दरम्यान, थेरगाव-वडजी रस्त्यावरून जात असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या घटनेत त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. ग्रामस्थ व त्यांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. संतोष आहेर यांना उपचारासाठी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. नोमान शेख यांनी त्यांची सखोल तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद पाचोड ठाण्यात केली आहे. दिवाळीतच कुटुंबाने कर्ता पुरुष गमावला घटनेची माहिती मिळताच बाजार समितीचे सभापती राजूनाना भुमरे यांनी पाचोड ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. मृत संतोष आहेर यांच्या नातेवाइकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व कुटुंबाला धीर दिला. आनंदी वातावरणातच कुटुंबाचा कर्ता पुरुष गमावल्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Source link
थेरगाव येथे दुचाकीचा अपघात; 45 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू:मोलमजुरी करून घरी परतताना काळाचा घाला, अपघाताचे कारण अस्पष्ट