Headlines

पठारे खून प्रकरणातील 8 आरोपी जेरबंद:सर्वांना 16 नोव्हेंबरपर्यंत सुनावली पोलिस कोठडी, अटक केलेल्या आरोपींची संख्या दहावर




शहराला हादरवून सोडणाऱ्या रोहित पठारे हत्याकांडातील फरार आरोपींभोवती अखेर पोलिसांचा फास आवळला आहे. राज्यासह परराज्यांत शोधमोहीम राबवून पोलिसांनी आठ आरोपींच्या मुसक्या आवळल्या. यापूर्वी दोघांना अटक झाल्याने गजाआड झालेल्यांची संख्या दहावर पोहोचली आहे. शनिवारी आरोपींना न्यायालयात नेताना संतप्त नागरिकांनी त्यांच्या अंगावर धाव घेण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, न्यायालयाने सर्व दहा आरोपींना १६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. अटक केलेल्यांमध्ये अमन सत्यपाल उंटवाळ, आनंद संतोष मथुरे उर्फ राजपूत, अमर मदनसिंग राजपूत, शंकर उर्फ प्रतीक राजू राजपूत, गजू उर्फ गजेंद्र रविंद्रसिंग राजपूत, क्रिश प्रितमसिंग राजपूत, लोकेश उर्फ सोनू गबरसिंग राजपूत आणि प्रमोद ज्ञानेश्वर वाघचौरे यांचा समावेश आहे. यापूर्वी मयूर बाबासाहेब राहणे आणि विशाल सामदास कडे यांना अटक झाली होती. शहर टाकळीतील निर्जनस्थळी असलेल्या बंद घरात अमन उंटवाळ लपल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्याला पकडले. उर्वरित संशयितांचा विविध ठिकाणी माग काढण्यात आला. दरम्यान, ३१ ऑक्टोबरच्या रक्तरंजित संघर्षात गंभीर जखमी झालेल्या रोहितचा ४ नोव्हेंबरला उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात ठिय्या, रास्ता रोको केल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. आरोपींना पाहताच संतापाचा उद्रेक आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी नेत असताना उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय परिसरात नागरिकांचा संताप अनावर झाला. जमलेल्या नागरिकांनी आरोपींच्या दिशेने धाव घेत अंगावर जाण्याचा प्रयत्न केला. सतर्क पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना रोखले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *