![]()
दिवाळीच्या सुटीत भाविकांची प्रचंड गर्दी विचारात घेऊन तुळजाभवानी मंदिर १० ते १५ नोव्हेंबर या कालावधीत २२ तास (मध्यरात्री १ वाजल्यापासून) दर्शनासाठी खुले राहणार आहे. गेल्या काही वर्षांत सुट्यांमध्ये मोठी गर्दी होत आहे. नेहमीप्रमाणे पहाटे ४:३० वाजता मंद
.
भाविकांची गर्दी लक्षात घेत मंदिर संस्थानने १ हजार रुपयांच्या स्पेशल दर्शन पासची सुविधा उपलब्ध केली आहे. आजपासून २४ नोव्हेंबरपर्यंत हे पास सुरू राहतील. याद्वारे भाविकांना थेट चोपदार दरवाजातून दर्शनाचा लाभ मिळेल.
सकाळच्या अभिषेक पूजेला ६ वाजता प्रारंभ
मध्यरात्री १ वाजता चरणतीर्थ पूजेनंतर मंदिर उघडेल. सकाळी ६ वा. अभिषेक पूजेला प्रारंभ होईल. सकाळी १० वा. पूजा संपवून देवीस महावस्त्र अलंकार आणि धुपारतीनंतर अंगारा काढण्यात येईल. सायंकाळी ७ वा. पुन्हा अभिषेक पूजा सुरू होईल. रात्री १०:३० वाजता प्रक्षाळ पूजेनंतर मंदिर बंद करण्यात येईल.