Headlines

शॉर्टसर्किटमुळे लागली आग:फुलंब्रीत कृषी दुकानांना आग; दीड कोटीचे नुकसान, दरी फाटा येथील घटना




फुलंब्री शहरातील दरी फाटा येथे रविवारी रात्री ऐन दिवाळीच्या दिवशी ११ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत दोन मोठी कृषी सेवा दुकाने जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुमारे दीड कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे शेतीपयोगी साहित्य, अवजारे आणि बी-बियाणे जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. फुलंब्री शहरालगत असलेल्या दरी फाटा परिसरामध्ये ‘समृद्धी कृषी उद्योग’ आणि ‘मातोश्री ॲग्रो एजन्सी’ ही दोन दुकाने शेजारीच आहेत. रविवारी रात्री अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे या दुकानांमध्ये आग लागली. पाहता पाहता आगीने उग्र रूप धारण केले आणि काही वेळातच दोन्ही दुकानांमधील साहित्याला तीव्र ज्वालांनी वेढले. या आगीमध्ये देवनाथ हिंमतराव जाधव यांच्या मालकीच्या दुकानाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. या दुकानातील महागडी आणि आधुनिक शेती यंत्रसामग्री आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्यामुळे शटर उघडले नाही ^रविवार रात्री अकरा वाजेच्या सुमारास दुकानांमध्ये धूर दिसला . शटर उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु दोन वर्षांपूर्वी शटर उघडताना अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. यामुळे शटर उघडले ना ही. -डॉ.भाऊसाहेब तरटे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *