Headlines

विद्यार्थ्यांसाठी फुलंब्री शहरात मराठवाड्यातील सर्वात मोठे शासकीय वसतिगृह लवकरच सेवेत:जूनपर्यंत काम करण्याची राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची सूचना




फुलंब्री तालुक्यात समाज कल्याण विभागाच्या वतीने मराठवाड्यातील पहिले अत्याधुनिक आणि मोठे शासकीय विद्यार्थी-विद्यार्थ िनी वसतिगृह उभे राहत असून, यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एकाच छताखाली राहण्यासह शिक्षणाची सोय उपलब्ध होणार आहे. सुमारे ६५ कोटी रुपये खर्चून साकारल्या जाणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सोमवार रोजी फुलंब्रीचे माजी आमदार, माजी विधानसभा अध्यक्ष तथा राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी जूनपर्यंत काम पूर्ण करण्याची सूचना राज्यपाल बागडे यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. यावेळी आमदार अनुराधा चव्हाण, आमदार सुहास शिरसाठ, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल, पंचायत समिती सभापती सर्जेराव मेटे, उपसभापती अश्विनी आजीनाथ सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. वसतिगृहाच्या कामाची पाहणी करताना राज्यपालांनी हे शैक्षणिक संकुल आगामी जून महिन्यातच विद्यार्थ्यांसाठी सुरू झाले पाहिजे, अशी सक्त ताकीद दिली. यावेळी संबंधित अभियंत्यांनी फर्निचरसाठी १० कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे आणि तीच मुख्य अडचण असल्याचे स्पष्ट केले. यावर तात्काळ दखल घेत, राज्यपाल बागडे यांनी मार्च महिन्यातील आर्थिक संकल्पनेत ही बाब समाविष्ट करून १० कोटी रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन दिले. २०० विद्यार्थी राहण्याची येथे असणार सुविधा फुलंब्री तालुक्यामध्ये मराठवाड्यात सर्वात मोठे हे वसतिगृह होणार असून यामध्ये १०० विद्यार्थी व १०० विद्यार्थिनी यांची राहण्याची सोय तसेच भव्य कॉलेज अशा तीन इमारती उभारण्यात येत आहेत. या इमारतीचे काम सध्या प्रगतिपथावर आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *