Headlines

शिवसेना फुटीनंतर शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक संजय राऊतांच्या घरी:राऊत म्हणाले- ते येतील, बेसनाचा लाडू खातील आणि आईचा आशीर्वाद घेऊन जातील




शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट निर्माण झाल्यानंतर, दोन्ही गटांच्या नेत्यांमधील राजकीय वैर आणि आरोप-प्रत्यारोप संपूर्ण राज्याने पाहिले आहेत. पण आता अशीच एक अनपेक्षित आणि सर्वांच्या भुवया उंचावणारी घटना मुंबईत घडली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. नेमके काय घडले? दिवाळीच्या निमित्ताने मंत्री प्रताप सरनाईक हे थेट संजय राऊत यांच्या घरी पोहोचले. सरनाईक ज्यावेळी राऊतांच्या घरी कुटुंबीयांची भेट घेत होते, त्यावेळी संजय राऊत घराखाली पत्रकारांशी संवाद साधत होते. पत्रकारांनीच राऊतांना प्रताप सरनाईक घरात असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “मी आता खाली आल्यावर बघितलंय कोण आलेत म्हणून… आता ते आलेत, जाऊन द्या. सत्कार झाला. हा जो स्नेह आहे, जो कौटुंबिक जिव्हाळा आहे… त्यांच्या आणि माझी आई जी आहे, यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि वर्षानुवर्षाचे संबंध आहेत. त्यामुळे ते दिवाळीला नेहमीच येतात.” राजकीय संकेत की फक्त बेसनाचा लाडू? शिवसेना फुटीनंतर शिंदे गटाचे मंत्री पहिल्यांदाच थेट राऊतांच्या घरी आल्याने, यातून काही राजकीय संकेत मानायचे का? असा प्रश्न पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारला. या प्रश्नावर हसत आणि अगदी मिश्किलपणे उत्तर देताना राऊत म्हणाले, “काही नाही. ते येतील… लाडू चकली खातील, त्यांना बेसनाचा लाडू आवडतो, तो बेसनाचा लाडू खातील आणि आईचा आशीर्वाद घेऊन निघून जातील. त्यापलीकडे या भेटीत काही नाही.” कौटुंबिक संबंध जपण्याचा प्रयत्न राजकारणात कितीही मतभेद असले तरी सणासुदीच्या काळात जुने कौटुंबिक संबंध आणि स्नेह जपण्याचा प्रयत्न या भेटीतून दिसून आला. संजय राऊत हे शिंदे सरकारवर आणि विशेषतः फुटून गेलेल्या आमदारांवर दररोज अत्यंत जळजळीत शब्दांत टीका करत असतात. अशा परिस्थितीत, प्रताप सरनाईक यांनी राजकीय वैर बाजूला ठेवून थेट राऊतांच्या आईचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या घरी जाणे, ही राजकीय वर्तुळात मोठी चर्चेची आणि आश्चर्याची बाब ठरली आहे. गोकुळच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान:शशिकांत पाटील की रणजीतसिंह पाटील? 4 नियुक्त संचालकांची मते सीलबंद ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील आणि रणजीतसिंह पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. यामध्यो कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी, राज्य शासनाने नियुक्त केलेल्या अतिरिक्त ४ संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या अध्यादेशावरून निर्माण झालेल्या कायदेशीर पेचावर औरंगाबाद खंडपीठाने अत्यंत महत्त्वाचा अंतरिम निर्णय दिला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *