![]()
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची सध्या कोणतीही चर्चा नाही. तसेच भाजपसोबत सत्तेत असताना विलीनीकरणाचा विषय येण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे ‘आमच्याशिवाय दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रीकरण होणार नाही’, असे मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य म्हणजे सत्तेचा अहंकार आहे, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या मुद्द्यावरून रोहित पवार यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत भाजपच्या नेत्यांनी भाष्य करण्याची आवश्यकता नाही. विलीनीकरणाची चर्चा नसताना त्यावरून राजकीय विधाने करणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अजितदादांना ब्लॅकमेल कोण करत होते? पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंढवा प्रकरणाचा वापर करून अजित पवार यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असा गंभीर आरोपही रोहित पवार यांनी केला. मात्र, अशा दबावाच्या प्रयत्नांना अजितदादांनी अजिबात भीक घातली नाही. त्यामुळे या प्रकरणात नेमके अजितदादांना ब्लॅकमेल कोण करत होते? त्यांना ब्लॅकमेल करण्याचे आदेश नेमके कुणी दिले होते? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. भाजप आणि त्यांच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या विषयात हस्तक्षेप करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. ब्लॅकमेलिंगच्या पायावर ज्यांचे राजकारण उभे आहे, अशा भाजपने आणि त्यांच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या विषयावर न बोललेलेच बरे, अशा शब्दांत रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली. ———- हेही वाचा.. अजित पवार महायुतीतून बाहेर पडून मविआतून मुख्यमंत्री होणार होते:काँग्रेसच्या अतुल लोंढेंचा दावा, म्हणाले- दादांच्या जाण्याने अपेक्षित राजकीय घडामोड होऊ शकली नाही
अजित पवार महायुतीतून बाहेर पडून महाविकास आघाडीत सहभागी होणार होते. तसेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री होण्याची त्यांची योजना होती, असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. अजित पवार यांच्या राजकीय हालचाली आणि काही घटनांचा दाखला देत लोंढे यांनी हा दावा केला. अजित पवार यांच्या निधनामुळे पुढे घडू शकणाऱ्या राजकीय घडामोडींना पूर्णविराम मिळाल्याचेही ते म्हणाले. सविस्तर वाचा
Source link
राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणात भाजपने हस्तक्षेप करू नये:रोहित पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला