![]()
राज ठाकरे यांनी छट पूजा उत्सवाला उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचा रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, राज ठाकरेंच्या माहितीसाठी सांगायचे तर, छट पूजा ही उत्तर प्रदेशचे लोक नव्हे, तर प्रामुख्याने बिहारचे लोक साजरी करतात, अशा शब्दांत भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रत्येक गोष्टीकडे निवडणुकीच्या चष्म्यातून पाहण्याची सवय झाल्यानेच राज ठाकरे आणि मनसे छट पूजेला विरोध करत आहेत. आता उत्तर प्रदेशची निवडणूक आहे, बिहारची नाही, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. छट पूजा हा हिंदूंचा सण असल्याने त्याला राजकारणाचा रंग देऊ नये, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. नवनाथ बन म्हणाले की, अजित पवार हे कधीही एनडीएमधून बाहेर पडणार नव्हते. उलट, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वीच अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली होती. भाजपसोबत राहिले पाहिजे, ही भूमिका अजित पवारांची आधीपासूनच होती आणि त्यांनी ती शरद पवारांसमोर मांडली होती. त्यामुळेच 2019 चा तो शपथविधी झाला होता, हे राऊत विसरले आहेत. अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दलचा अपप्रचार आता थांबवला पाहिजे. राऊतांच्या अधिकारावर सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर भाष्य करताना बन म्हणाले की, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर जरी पडदा पडला असला, तरी ठाकरे गट कधी काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे, हे संजय राऊत यांनी स्पष्ट केले पाहिजे. शरद पवार एनडीएसोबत येणार की वेगळी भूमिका घेणार, हे ठरवण्याचा अधिकार राऊतांना नाही; शरद पवार तो निर्णय घेण्यासाठी स्वतः सक्षम आहेत. तुम्ही मात्र उबाठाचे अस्तित्व संपवून काँग्रेसच्या दावणीला स्वतःला बांधून घेतले आहे. उद्धव ठाकरे काँग्रेसमध्ये जाणार, समाजवादी पार्टीमध्ये जाणार की एमआयएमसोबत जाणार, याचा निर्णय राऊतांनी जाहीर करावा, कारण उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे निर्णय घेण्याची जबाबदारी राऊतांवर देण्यात आली असून, ते आता उबाठाचे ‘प्रतिपक्षप्रमुख’ झाले आहेत. ‘केम छो वरळी’वरून राऊतांना पलटवार महाराष्ट्राचा गुजरात होत असल्याच्या संजय राऊत यांच्या दाव्याचा समाचार घेताना नवनाथ बन म्हणाले की, वरळीतून आदित्य ठाकरेंच्या प्रचारादरम्यान ‘केम छो वरळी’ या घोषणेनेच झाली होती. मुख्यमंत्री देवेनभाई नव्हे, तर देवाभाऊच आहेत. तुम्हीच वरळीला गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न केला होता आणि मतांसाठी ‘केम छो’ सारख्या घोषणा दिल्या होत्या. आम्ही विकासाचे राजकारण करतो, तर तुम्ही फक्त मतांचे राजकारण करता, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. संजय शिरसाटांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील घरावर झालेल्या हल्ल्याचा भाजपने तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणी पोलिसअत्यंत गांभीर्याने चौकशी करत असून सखोल तपास केला जाईल. असा भ्याड हल्ला करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही,असा इशारा नवनाथ बन यांनी दिला आहे.
Source link
शरद पवारांचा निर्णय घेणारे राऊत कोण?:ते तर आता उबाठाचे 'प्रतिपक्षप्रमुख' झालेत, मुख्यमंत्री देवेनभाई नव्हे, तर देवाभाऊच- नवनाथ बन