![]()
पुणे येथे आयोजित CBSE राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये ओडिशा AM/NS इंडिया जिम्नॅस्टिक्स हाय परफॉर्मन्स सेंटर, भुवनेश्वर आणि ग्रासरूट सेंटर, राउरकेला येथील खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत या केंद्रांच्या 13 खेळाडूंनी
.
हाय परफॉर्मन्स सेंटरच्या खेळाडूंची चमक
भुवनेश्वर येथील हाय परफॉर्मन्स सेंटरच्या खेळाडूंनी विविध वयोगटांमध्ये आपल्या शाळांचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये 17 वर्षांखालील मुलींच्या गटात प्रीती झंकार, 14 वर्षांखालील मुलींच्या गटात सुभिदिता बाग, शौम्यश्री प्रियदर्शिनी आणि जास्मिन प्रहराज, तर 11 वर्षांखालील मुलींच्या गटात रोज मिन्झी यांचा समावेश होता.
राउरकेलाच्या खेळाडूंची पहिलीच राष्ट्रीय झेप
राउरकेला येथील ग्रासरूट सेंटरच्या खेळाडूंनी प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग नोंदवला. यामध्ये 11 वर्षांखालील मुलांच्या गटात अद्विन नाग आणि प्रणबजैन महाला, 14 वर्षांखालील मुलींच्या गटात अद्रिशा कोठारी, तर 11 वर्षांखालील मुलींच्या गटात प्रिया बडाईक, रिमझिम सिल, पंकुरी सिल, अद्याशा पात्रा आणि बिद्यांका बेहरा यांचा समावेश होता.
कोणी किती पदके जिंकली? –
प्रीती झंकारने 17 वर्षांखालील गटात ऑल-अराउंड आणि बॅलन्स बीम या प्रकारांमध्ये दोन सुवर्णपदके जिंकली. 11 वर्षांखालील गटात रोज मिन्झीने ऑल-अराउंड आणि बॅलन्स बीममध्ये दोन सुवर्णपदके, तर फ्लोअर एक्सरसाइजमध्ये एक रौप्यपदक पटकावले.
14 वर्षांखालील गटात शौम्यश्री प्रियदर्शिनीने बॅलन्स बीममध्ये रौप्य आणि वॉल्ट प्रकारात कांस्यपदक मिळवले. याच गटात सुभिदिता बागने अनइव्हन बार्स आणि वॉल्ट या प्रकारांमध्ये दोन रौप्यपदके जिंकली. ग्रासरूट सेंटरच्या खेळाडूंमध्ये 11 वर्षांखालील मुलांच्या गटात प्रणबजैन महालाने पॅरलल बार्स प्रकारात कांस्यपदक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली.
AM/NS इंडियाकडून अभिनंदन
खेळाडूंचे अभिनंदन करताना AM/NS इंडियाचे संचालक आणि उपाध्यक्ष – मानव संसाधन व प्रशासन, आशुतोष तेलंग म्हणाले, CBSE राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये आमच्या युवा खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा आम्हाला मनापासून अभिमान आहे. त्यांच्या यशातून खेळाप्रती असलेली मेहनत, शिस्त आणि जिद्द दिसून येते. राउरकेला येथील आमच्या ग्रासरूट सेंटरच्या खेळाडूंनी पहिल्याच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रभावी कामगिरी केल्याचा आम्हाला विशेष आनंद आहे.
“AM/NS इंडिया येथे क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. खेळाडूंना प्राथमिक स्तरापासून उच्च कामगिरीच्या टप्प्यापर्यंत प्रत्येक स्तरावर आवश्यक सहकार्य देणारी सक्षम व्यवस्था निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असेही तेलंग म्हणाले.
400 हून अधिक पदकांचा विक्रम
ओडिशा AM/NS इंडिया जिम्नॅस्टिक्स हाय परफॉर्मन्स सेंटर हे भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियममध्ये स्थित आहे. 2023 मध्ये सुरू झालेल्या या केंद्रातील खेळाडूंनी आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 400 हून अधिक पदके जिंकली आहेत. AM/NS इंडिया आपल्या ‘उडान’ या उपक्रमांतर्गत दरवर्षी 450 जिम्नॅस्ट्सना प्रशिक्षण देते.