Headlines

जालन्यात गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा:मांत्रिकासह 9 जणांना अटक; मंठा तालुक्यातील पोखरी गावातील प्रकार




काही महिन्यांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. या घटनेने पुरोगामी महाराष्ट्रातील अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला होता. या प्रकरणानंतर सरकारने कडक पावले उचलत आरोपीला अटक केली होती, तसेच राज्यभर अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या भोंदूबाबांवर कारवाईचा बडगा उगारला होता. आता याच पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात असाच एक धक्कादायक अघोरी पूजेचा आणि भोंदूगिरीचा प्रकार उघडकीस आला आहे. जालना जिल्ह्याच्या मंठा तालुक्यातील पोखरी गावात गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा करण्यात आली. शेतात सोन्याचे सात हंडे पुरलेले असल्याची बतावणी करून बुधवारी रात्री नऊ जणांनी एका शेतात पूजेचा घाट घातला होता. रात्रीच्या अंधारात गुप्तधन मिळवण्यासाठी हा अघोरी विधी सुरू असतानाच, गावकऱ्यांना याची कुणकुण लागली. गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत हा प्रकार थांबवला आणि पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनीही तातडीने दखल घेत एका मांत्रिकासह नऊ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांची कारवाई या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून लिंबू, नारळ, बदाम, सुपारी यांसारखे अघोरी पूजेचे साहित्य जप्त केले आहे. याशिवाय घटनास्थळावरून एक कार आणि इतर काही संशयास्पद वस्तूही ताब्यात घेण्यात आल्या आहेत. परतूरचे पोलिस उपअधीक्षक रोहित कमलदाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सर्व आरोपींवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. पाण्यासाठी तरुणाची खासदारांसमोर मागणी दुसरीकडे, जायकवाडी प्रकल्पातून गेवराई तालुक्यातील 40 गावांसाठी स्वतंत्र कालवा निर्माण करावा, या मागणीसाठी सध्या आंदोलन उभारले जात आहे. गेवराई (जि. बीड) तालुक्यातील शिंगारवाडी येथील मंदिर परिसरात याच प्रश्नावर ‘लोकलढा’ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला बीडचे खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते. विशेष म्हणजे, खासदारांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच मनीष शेळके नावाच्या एका स्थानिक तरुणाने थेट हातात माईक घेतला. ‘बीडमध्ये रेल्वे आणण्याचे श्रेय अनेकजण घेतात, पण आता आमच्या पाण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या,’ अशी रोखठोक मागणी करत या तरुणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *