Headlines

गणेश नाईक भाजपचेच आहेत का? DNA तपासण्याची वेळ आली:मंदा म्हात्रेंचा थेट सवाल, नवी मुंबईत भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर




राज्यात सत्तेत असलेल्या भाजपमधील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत. नवी मुंबईत भाजपचे वनमंत्री गणेश नाईक आणि भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. शहरातील विकासकामांवरून सुरू झालेल्या या वादाला आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे स्वरूप आले आहे. गणेश नाईक यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मंदा म्हात्रे यांनी थेट त्यांच्या भाजपमधील निष्ठेवरच सवाल उपस्थित केला आहे. ‘गणेश नाईक नक्की भाजपचेच आहेत का? त्यांचा डीएनए तपासला पाहिजे,’ अशा शब्दांत त्यांनी टीका केली. मंजूर विकासकामांना विरोध होत असल्याचा म्हात्रेंचा आरोप नवी मुंबईतील नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि शहराच्या विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रकल्प आपण आमदार म्हणून सरकारकडून मंजूर करून आणले आहेत. या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला आहे. मात्र, ही कामे प्रत्यक्षात सुरू होऊ नयेत किंवा त्यांची अंमलबजावणी होऊ नये, यासाठी स्थानिक भाजप नेत्यांकडूनच अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप मंदा म्हात्रे यांनी केला आहे. शहराच्या विकासासाठी रुग्णालय, लायब्ररी, मरिना सेंटर आणि स्टेडियम यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांचा फायदा नवी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. मात्र, या कामांना विरोध करण्याची भूमिका गणेश नाईक घेत असल्याचा दावा म्हात्रे यांनी केला. विशेष म्हणजे, भाजपच्या आमदाराने मंजूर करून आणलेल्या विकासकामांना भाजपच्याच मंत्र्याकडून विरोध होत असेल, तर पक्षातील समन्वयाचा प्रश्न निर्माण होतो, असेही त्यांच्या टीकेतून स्पष्ट झाले. ‘गणेश नाईक भाजपचेच आहेत का?’ असा थेट सवाल विकासकामांमध्ये अडथळे आणले जात असल्याच्या मुद्द्यावरून मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांच्यावर केवळ नाराजी व्यक्त केली नाही, तर त्यांच्या पक्षनिष्ठेवरही प्रश्न उपस्थित केला. भाजपमध्ये राहून भाजपच्या आमदारांच्या कामांना विरोध करणे योग्य नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. याच पार्श्वभूमीवर गणेश नाईक यांचा डीएनए तपासण्याची गरज असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. म्हात्रे यांच्या या विधानामुळे नवी मुंबईतील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. भाजपमधील दोन प्रमुख नेत्यांमधील मतभेद आता सार्वजनिक व्यासपीठावर येत असल्याचे या वक्तव्यावरून दिसून येते. गणेश नाईक समर्थकांकडून आरोपांचे खंडन दरम्यान, मंदा म्हात्रे यांनी केलेले आरोप गणेश नाईक समर्थक नगरसेवकांनी फेटाळून लावले आहेत. विकासकामांना जाणीवपूर्वक विरोध केला जात असल्याचा दावा चुकीचा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काही तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय प्रक्रियांमुळे संबंधित कामांना मंजुरी किंवा अंमलबजावणीसाठी विलंब होत असल्याचे समर्थकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकीय विरोधापेक्षा प्रशासकीय आणि तांत्रिक बाबी महत्त्वाच्या असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. नवी मुंबई भाजपमधील गटबाजी पुन्हा चर्चेत गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई भाजपमधील अंतर्गत मतभेदांची चर्चा सुरू आहे. गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यातील राजकीय संघर्ष नवीन नसला, तरी विकासकामांच्या मुद्द्यावरून झालेली ही टीका पक्षातील अंतर्गत समन्वयाचा प्रश्न ऐरणीवर आणणारी आहे. एकीकडे शहराच्या विकासासाठी निधी आणि प्रकल्प मंजूर करून आणल्याचा दावा आमदार मंदा म्हात्रे करत आहेत, तर दुसरीकडे या कामांमध्ये अडथळे नसून तांत्रिक कारणांमुळे विलंब होत असल्याचे नाईक समर्थक सांगत आहेत. त्यामुळे हा वाद केवळ दोन नेत्यांमधील वैयक्तिक मतभेदांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर नवी मुंबईतील भाजपच्या स्थानिक राजकारणावरही त्याचे परिणाम होण्याची शक्यता आहे. आगामी काळात या दोन्ही नेत्यांमधील संघर्ष कसा मिटणार आणि शहरातील रखडलेल्या विकासकामांना गती मिळणार का, याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा…. ‘…आता तुम्ही खोट्या बातम्या छापता की गडकरी निवृत्त होणार’:निवृत्तीच्या चर्चांवर मंत्री नितीन गडकरींचा मिश्किल टोला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या याआधीच्या काही वक्तव्यांमुळे त्यांच्या राजकीय निवृत्तीच्या चर्चांना वारंवार उधाण येत असते. मात्र आज एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी या चर्चांवर मिश्किल टोला लगावला आणि म्हटले, ‘मी जेव्हा काम सुरू केले पाण्यावर, आता माझे 26 वर्षांनी वय वाढले आहे. मग मी म्हणतो की आता तरुण लोक बोलवा, आणि तुम्ही खोट्या न्यूज छापता की गडकरी निवृत्त होणार…’ त्यांच्या या वक्तव्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये एकच हशा पिकला. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *