Headlines

स्वार्थासाठी पक्ष सोडणाऱ्यांना जनता माफ करणार नाही:शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुखांचा इशारा, औंढा नागनाथ येथे पदाधिकाऱ्यांची बैठक




राजकिय स्वार्थासाठी पक्ष सोडणाऱ्यांना जनता कदापीही माफ करणार नाही, त्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विचलीत न होता आगामी निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी शनिवारी ता. १४ औंढा नागनाथ येथे केले. औंढा नागनाथ येथील शासकीय विश्रामगृहामध्ये शनिवारी १४ शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी सह संपर्कप्रमुख विनायकराव भिसे, उपजिल्हाप्रमुख जी. डी. मुळे, गणेश शिंदे, दिलीप घुगे, बाळासाहेब मगर, सोपान पाटील बोंढारे, डॉ.रमेश मस्के, पराग अडकिने, शंकर घुगे, तालुकाप्रमुख अनिल शिंदे, माऊली झटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत, ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पक्षाच्या रणनितीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी बोलतांना देशमुख म्हणाले की, आगामी निवडणुका जिंकायच्या असतील तर सर्व कार्यकर्त्यांनी आता पासूनच कामाला लागले पाहिजे. गावपातळीवर जाऊन जनतेच्या अडचणी जाणून घ्याव्यात. कोण पक्ष सोडून गेले त्याकडे लक्ष देण्यापेक्षा जनतेच्या प्रश्‍नांची सोडवणुक कशी करता येईल याकडे लक्ष द्यावे. सर्व सामान्य जनता आपल्या पाठिशी असून पक्ष सोडणाऱ्यांना आगामी निवडणुकीत जनता चांगलाच धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही असा दावा त्यांनी यावेळी केला. शिवसेना पक्ष खासदार, आमदार ,सभापती व पदाधिकारी घडवणारा पक्ष आहे. त्यामुळे सर्वांनी पक्षाचे काम करावे व पक्षाने दिलेल्या पदाधिकाऱ्याला निवडून आणण्याचे काम करावे. गाव पातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी गाव तेथे शाखा तसेच मोठ्या शहरातून प्रभागनिहाय शाखा स्थापन करून पदाधिकाऱ्यांच्या निवडी कराव्यात. आम्ही सर्व पदाधिकारी तुमच्या सोबत आहोत अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *