![]()
सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध कवयित्री, पाटण येथील बाळासाहेब देसाई कॉलेजच्या मराठी विभागाच्या प्रमुख व निवृत्त प्रभारी प्राचार्य, ज्येष्ठ साहित्यिक प्रमोद मनोहर कोपर्डे यांच्या ज्येष्ठ भगिनी डॉ. रामकली रमाकांत पावसकर (77) यांचे सातारा येथील जीवनज्योत हॉस्पिटलमध्ये शनिवार दि. 14 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ व चार विवाहित बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर संगममाहुली येथील कैलास स्मशानभूमीतील गॅस दाहिनी मध्ये कोणतेही धार्मिक विधी न करता अंत्यसंस्कार करण्यात आले. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या पुरस्कार योजनेसाठी त्यांनी बहुमोल आर्थिक सहाय्य केले आहे. त्यांचे सहा कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत त्यामध्ये “निरव किनाऱ्यावर” (डिम्पल प्रकाशन), हंबर (चेतश्री प्रकाशन), ओले अथांग श्वास (शब्दालय प्रकाशन ), सांजसावल्या (डिम्पल प्रकाशन), पावळण (डिम्पल प्रकाशन) रें आभाळा (डिम्पल प्रकाशन) या कविता संग्रहाचा समावेश आहे. ‘1980 नंतरची मराठी कविता प्रवृत्ती आणि प्रवाह’ या विषयावरील समीक्षा ग्रंथ ही स्वरूप प्रकाशन (औरंगाबाद) द्वारे प्रसिद्ध आहे. साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
Source link
साताऱ्यातील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रामकली पावसकर यांचे निधन:कोणतीही धार्मिक विधी न करता संगममाहुलीत अंत्यसंस्कार