![]()
कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कालव्याला मोठे भगदाड पडल्याने, शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी शेतात जाण्याऐवजी नाल्यातून वाहून जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वारंवार तक्रारी करूनही सिंचन विभागाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने, अखेर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्वखर्चाने जेसीबी लावून कालव्याची दुरुस्ती सुरू केली आहे. आज शिवानी वडेट्टीवार यांनी या घटनास्थळाची पाहणी करत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि सिंचन विभागाच्या या भोंगळ कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याची अशी दुर्दशा का? कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कालव्याला मोठे भगदाड पडल्याने शेतात पोहोचण्याऐवजी पाणी नाल्यातून वाहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेऊन शिवानी वडेट्टीवार यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. कालव्याची झालेली दुरवस्था, मोठे भगदाड आणि पाण्याची नासाडी याची माहिती घेत त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. विशेष म्हणजे, वारंवार तक्रारी करूनही सिंचन विभागाने कालव्याची दुरुस्ती केली नाही. अखेर शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन विजय वडेट्टीवार यांनी स्वखर्चाने जेसीबी मशीन लावून भगदाड बुजविण्याचे आणि नुकसानग्रस्त भागाची दुरुस्ती करण्याचे काम सुरू केले. प्रश्न असा आहे की, कोट्यवधी रुपये खर्चून सिंचन योजना उभारायची, पण तिच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष करायचे,मग शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी मिळणार तरी कसे? असा सवाल शिवानी वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशातून उभारलेल्या योजनांची अशी अवस्था होणे ही गंभीर बाब आहे. सिंचन विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. शिवानी वडेट्टीवार यांनी पाहणीदरम्यान शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेतला. सत्तेतील यंत्रणा दुर्लक्ष करत असताना शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणे, हीच लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे. मोखाबर्डी सिंचन योजनेतील निकृष्ट कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे.
Source link
शेतकऱ्यांचे पाणी नाल्यात!:मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेला भगदाड, विजय वडेट्टीवारांनी स्वखर्चाने सुरू केली दुरुस्ती