Headlines

सोन्याचा 1.51 लाखांचा दर असूनही सराफ बाजार “हाऊसफुल्ल’:लग्नसराईमुळे खरेदीस गर्दी, सुरक्षित गुंतवणूक म्हणून ‘डिजिटल गोल्ड’कडे वाढताेय कल‎



आखाती देशांतील युद्धामुळे सोन्याच्या दराने उच्चांकी भरारी घेतली आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यात लग्नसराईच्या अक्षता पडत आहेत. या पार्श्वभूमीवर सराफ बाजारात गर्दी वाढत आहे. सोन्याचे वाढते भाव आणि लग्नासाठीची अपरिहार्यता या कात्रीत सापडलेला ग्राहक आता स्मार

.

मागील ३० दिवसांत सोन्याच्या दरात मोठी अस्थिरता पाहायला मिळाली. महिन्याच्या सुरुवातीला १ लाख ४५ हजार हजार ते १ लाख ६० हजार रुपये (प्रति १० ग्रॅम) दरम्यान असलेले दर मध्यंतरी १ लाख ६२ हजार रुपयांच्या पार गेले होते. आखाती देशांमधील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती आणि जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे कल वाढला आहे. परिणामी, दरात प्रति तोळा ३ ते ४ हजार रुपयांची वाढ झाली आहे.

असे असूनही, नगरकर दरवाढीच्या भीतीपोटी आत्ताच खरेदीला प्राधान्य देत आहेत.सध्या सोन्याचे दर १ लाख ५१ हजार ४०० रुपये (प्रति १० ग्रॅम) असे आहेत. तरीही जिल्ह्यात सध्या लग्नसराईचे मुहूर्त असल्याने सराफ बाजारात मोठी गर्दी दिसून येत आहे. विशेषतः ग्रामीण भागातून शेतीमालाला मिळालेल्या पैशातून सोने खरेदीसाठी ग्राहक शहरात येत आहेत. सध्या लग्न सराई असल्याने सोने खरेदीसाठी सराफा दुकाना मोठी गर्दी होत आहे.

चांगला परतावामिळतो म्हणूनही पसंती सोन्याकडे केवळ दागिना म्हणून नाही, तर सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. शेअर बाजारातील अस्थिरतेच्या काळात सोन्याने नेहमीच चांगला परतावा दिला आहे. त्यामुळे सुरक्षित भविष्यासाठी व आणीबाणीच्या काळात उपयोगी पडेल म्हणून नगरकर दरमहा थोड्या प्रमाणात सोने खरेदीला पसंती देत आहेत.

पारंपारिक व हलक्या दागिन्यांना पसंती ^ सराफ बाजारात कोल्हापुरी साज, ठुशी, चिंचपेटी, मणीमंगळसूत्र आणि बोरमाळ यांसारख्या पारंपरिक दागिन्यांना मोठी मागणी आहे. तसेच तरुण पिढीमध्ये ऑफिस वेअर किंवा दैनंदिन वापरासाठी कमी वजनाच्या दागिन्यांचा ट्रेंड वाढला आहे. यामध्ये नथ, चेन आणि अंगठ्यांचा समावेश आहे. – अमित पोखर्णा, सराफ व्यावसायिक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *