Headlines

सिल्लोड:वीजचोरीप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा




तालुक्यातील पानवडोद बुद्रुक येथे वीज कंपनीची कोणतीही परवानगी न घेता वीज मीटरच्या वायरिंगमध्ये फेरफार करून अनधिकृतपणे वीजचोरी केल्याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध सिल्लोड शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महावितरणचे सहाय्यक अभियंता मिलिंद गंगाराम इंगळे (४७, रा. अजिंठा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सुलाबाई किसनराव लोखंडे आणि मुक्ताबाई भगवान कोल्हे (दोघी रा. पानवडोद बुद्रुक, ता. सिल्लोड) यांच्याविरुद्ध भारतीय विद्युत अधिनियम २००३ मधील कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ ते ९.३० वाजेदरम्यान पानवडोद बुद्रुक येथे हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. वीज कंपनीच्या परवानगीशिवाय मीटरच्या वायरिंगमध्ये जाणूनबुजून फेरफार करून वीज चोरी केल्याचा आरोप आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *