![]()
अजिंठा डोंगररांगांतील सोयगाव-कन्नड तालुक्यांच्या सीमेवर वडोद परिसरात नायगाव पंप्ड स्टोअरेज जलविद्युत प्रकल्पासाठी १० हजार कोटींची गुंतवणूक नियोजित आहे. केंद्र सरकारकडून या प्रकल्पाला टर्म्स ऑफ रेफरन्स मंजुरी मिळाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पर्यावरणीय प्रभाव अहवालानुसार २ हजार मेगावॅट वीजनिर्मितीची क्षमता असलेल्या या प्रकल्पासाठी ५३० हेक्टर जमीन लागेल. त्यात २९७ हेक्टर राखीव वनक्षेत्र बाधित होईल, असा पर्यावरणप्रेमींचा दावा आहे. जंगलात झाडांचे मार्किंग सुरू आहे. भूसंपादनाचा प्रस्ताव नाही : नायब तहसीलदार देशमुख भूसंपादनाबाबत सोयगावचे नायब तहसीलदार संभाजीराव देशमुख म्हणाले, तहसील कार्यालयात कागदपत्रे आलेली नाहीत. अद्याप कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही. वन विभागाचा नकारात्मक अभिप्राय : उपवनसंरक्षक उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी सांगितले की, नायगाव प्रकल्पाच्या सॅम्पल सव्र्व्हेनुसार मोठ्या प्रमाणात झाडे बाधित होतील. नकारात्मक अभिप्राय नोंदवला आहे. डोंगरात अद्याप कामे नाहीत, सध्या कार्यालयीन प्रक्रिया नायगावच्या डोंगराळ भागात अद्याप कोणतेही काम सुरू झालेले नाही. सध्या कार्यालयीन कामे सुरू आहेत. वृक्षतोडीबाबत माहिती सांगता येणार नाही. संजय गायकवाड, प्रकल्प व्यवस्थापक, ग्रीनको एनर्जी प्रा.लि. वन्यजीवांचा अधिवास धोक्यात औट्रमघाट अभयारण्यापासून या प्रकल्पाचे अंतर ११.५० किमी आहे. अजिंठ्याच्या जंगलात बिबट्या, अस्वलांचा अधिवास बाधित होईल, असा दावा परिसरातील वन्यजीवप्रेमींनी केला आहे.
Source link
दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:जलविद्युत प्रकल्पासाठी अजिंठ्याच्या डोंगररांगेत झाडांवर मार्किंग