![]()
सध्याच्या दुष्काळी परिस्थितीकडे जलसंधारणाची व्यापक कामे करण्याची संधी म्हणून पाहावे. प्रत्येक गावाने लोकसहभागातून जलसंधारणाची कामे हाती घेऊन दुष्काळावर मात करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात जलसंधारणाच्या कामांना सर्वाधिक दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंब्रिज स्कूल चौक मैदानावर गुरुवारी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (२०२५-२६)’ अंतर्गत विभागस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आणि ‘दुष्काळावर मात व समृद्ध गावाचा संकल्प’ परिसंवाद पार पडला. यावेळी ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री योगेश कदम, मेघना साकोरे-बोर्डीकर, विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासह विभागातील आमदार, जिल्हा परिषद पदाधिकारी व ७,६८९ ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या कार्यक्रमावर जिल्हा परिषद सदस्य विद्या गायकवाड यांच्यासह अनेकांनी बहिष्कार टाकला होता. जलतारा शोषखड्डे, गाळ काढणे व बोअरवेल पुनर्भरणातून पाण्याचा प्रत्येक थेंब साठवा; ग्रामपंचायतींनी सौरऊर्जेचा वापर वाढवावा, असे सावे यांनी सांगितले. राज्यमंत्री योगेश कदम म्हणले की, दापोलीत सरकारी निधीशिवाय १,१०० वनराई बंधारे लोकसहभागातून उभारले; मराठवाड्यानेही हाच पॅटर्न राबवावा. यावेळी मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, महिला बचत गट, लखपती दीदी आणि तरुणांच्या सहभागातून गावागावांत हिवरे बाजारचा आदर्श व ‘जलतारा’ उपक्रम राबवावा.
पुरस्कार विजेत्या पंचायती विभागस्तरीय उत्कृष्ट ग्रामपंचायती: प्रथम (१ कोटी रुपये) : दाटेगाव (ता. जि. हिंगोली), द्वितीय (८० लाख रुपये) : आनंदवाडी-गौर (ता. निलंगा, जि. लातूर),तृतीय (६० लाख रुपये): वंजरवाडी (ता. जि. बीड), छत्रपती संभाजीनगर जिल्हास्तरीय पुरस्कार प्रथम (५० लाख रुपये): लाडगाव / हिवरा (ता. छत्रपती संभाजीनगर), द्वितीय (३० लाख रुपये): जरंडी (ता. सोयगाव), तृतीय (२० लाख रुपये): पाटोदा (ता. छत्रपती संभाजीनगर)
Source link
जलसंधारण चळवळीतून दुष्काळावर मात करा:पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांचे आवाहन