![]()
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदा उद्भवलेल्या तीव्र पाणीटंचाईने फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. वर्षानुवर्षे अपार मेहनत, भांडवल आणि घाम गाळून पोटच्या लेकरांप्रमाणे जपलेल्या मोसंबीच्या बागा पाण्याअभावी वाळण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यात २३ हजार २८३ हेक्टरवर मोसंबीचे क्षेत्र असून, एका महिन्यात ३ हजार हेक्टरवरील मोसंबीच्या बागांवर कुऱ्हाड चालविण्यात आली असून, सध्या ८ हजार हेक्टरवरील बागा पाण्याअभावी करपल्या आहेत, तर १२ हजार हेक्टरवरील बागा जगविण्यासाठी शेतकरी टँकरचा आधार घेत असल्याचे चित्र आहे. शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून जिल्ह्यातील शेतकरी मोसंबी लागवडीकडे वळले होते. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, २३ हजार २८३ पैकी ३ हजार हेक्टरवरील बागा शेतकऱ्यांनी तोडून टाकली. तर ८ हजार हेक्टरवरील बागा वाळून चालल्या आहेत. सध्या १२ हजार हेक्टरवरील बागा चांगल्या असल्या तरी त्यांना जगविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. पैठणच्या पाचोड, बालानगर, थेरगावसह अन्य भागांत परिस्थिती गंभीर आहे. जायकवाडी धरण परिसर आणि डाव्या-उजव्या कालव्यालगतच्या बागांना सिंचनाचा आधार मिळत असल्याने त्या तुलनेने टिकून आहेत; मात्र सिंचनाची सुविधा नसलेल्या कोरडवाहू भागांतील बागा उजाड होत आहेत. याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. मोसंबीची लागवड केल्यावर पाच वर्षांचा कालावधी फळधारणेसाठी लागतो. त्यात मोसंबीच्या बागेत कोणतेही पीक घेता येत नाही. त्यामुळे पाच वर्षे फळधारणेची प्रतीक्षा केलेल्या शेतकऱ्यांना आता डोळ्यादेखत झाडे वाळताना पाहावी लागत आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पाणी नसल्याने जेसीबीद्वारे बाग काढून टाकली आहे. ठिबकचा वापर करावा पाणी थेट मुळांशी पोहोचविण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करून ड्रिपर नियमित तपासावेत. बाष्पीभवन रोखण्यासाठी झाडांच्या बुंध्याभोवती वाळलेले गवत, उसाचे पाचट, पालापाचोळा किंवा गव्हाच्या काडाचा ४ ते ६ इंच जाडीचा सेंद्रिय थर द्यावा. उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षणासाठी खोडाला बोर्डोपेस्ट लावून गवत किंवा बारदाना गुंडाळण्याचा पर्याय स्वीकारावा. पाच वर्षे मोसंबीला फळधारणेची प्रतीक्षा धरणात पाणी असूनही पिके जगवण्यासाठी संघर्ष जायकवाडीत साठा असतानाही धरण व कालव्यांपासून दूर असलेल्या शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे केवळ पाणीसाठा वाढविण्यापेक्षा उपलब्ध पाण्याचे नियोजन,आणि जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी जितुभाऊ परदेशी. बजरंग लिंबोरे यांनी केली. {विकास पाटील, तालुका कृषी अधिकारी, पैठण
Source link
दुष्काळाचा फळबागांना फटका; 3 हजार हेक्टरवरील मोसंबीवर कुऱ्हाड:सध्या पाण्याअभावी 8 हजार हेक्टरवरील मोसंबी बागा करपल्या