Headlines

सात दरवाजांसाठी 384 कुलपे, कोरोना काळात 18 कोटींची उधळपट्टी:यावलच्या शासकीय रुग्णालयातील प्रकार, बिलांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचा वेतन निधी वापरला



अवघी ६ ते ७ दालने असलेल्या यावल येथील ग्रामीण रुग्णालयासाठी तब्बल ३८४ कुलपे आणि विजेची व्यवस्था असतानाही ३६ गॅस लॅम्प खरेदी केल्याचा धक्कादायक साहित्य खरेदी घोटाळा समोर आला आहे. २०२० ते २०२२ या कोरोना काळात झालेल्या या व्यवहाराची पोलखोल शासकीय लेखापर

.

अजब खरेदीचा नमुना : एकाच साच्यातून ‘कॉपी-पेस्ट’ पुरवठा : तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी ११ फेब्रुवारी २०२१ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार, नाशिक येथील ‘मे. गृहलक्ष्मी महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित’ या संस्थेला जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांना दैनंदिन किरकोळ साहित्य पुरवण्याचे आदेश दिले होते. यावल रुग्णालयाच्या पोचपावतीनुसार, गरज आणि क्षमतेचा विचार न करता अवाढव्य साहित्याचा पुरवठा करण्यात आला.

कुलुपांचा पाऊस

खोल्या व कपाटांसाठी जास्तीत जास्त ७ कुलुपांची गरज असताना ३२ डझन म्हणजेच ३८४ कुलुपे खरेदी करण्यात आली.

निरुपयोगी दिव्यांची खरेदी

विजेची व्यवस्था असतानाही ३६ ऑटोमॅटिक गॅस लॅम्प, प्रत्येकी ३ डझन स्पिरिट व फोकसिंग लॅम्प, ५ डझन इमर्जन्सी लॅम्प खरेदी केले.

अत्यावश्यक बाबीमुळे मान्यता घेता आली नाही

परवानगी घेणे आवश्यक होते, मात्र तातडीची परिस्थिती असल्याने ती घेता आली नाही. कोरोना काळात त्या-त्या ठिकाणचे बीडीओ, तहसीलदार व वैद्यकीय अधिकारी इन्चार्ज होते. वेळोवेळी लागणाऱ्या साहित्याची मागणी त्यांनी व्हीसीद्वारे केली होती. डॉ. नागोजीराव चव्हाण, तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक

मंत्रालयातून निघाला बिले काढण्याचा मार्ग

  • लेखापरीक्षणाचे आक्षेप असतानाही पुरवठादार संस्थेचे १८.९२ कोटींचे बिल काढण्यासाठी मंत्रालयातून अवघ्या १६ दिवसांत चार शासन निर्णय व शुद्धिपत्रके काढली.
  • २५ ऑक्टोबर २०२३ : सार्वजनिक आरोग्य विभागाने १८.९२ कोटींच्या प्रलंबित बिलाला प्रशासकीय मान्यता देणारा पहिला शासन निर्णय काढला.
  • ३१ ऑक्टोबर २०२३ : सहा दिवसांत खर्चाला कार्योत्तर मंजुरी देणारा दुसरा निर्णय निघाला. लेखापरीक्षकांचा आक्षेप नसल्याची खातरजमा केल्याशिवाय देयक देऊ नये, असे नमूद होते.
  • १० नोव्हेंबर २०२३ : बिलाची रक्कम थेट जिल्हा शल्यचिकित्सकांच्या खात्यातून काढण्यासाठी शासन शुद्धिपत्रक काढण्यात आले.
  • ११ नोव्हेंबर २०२३ : दुसऱ्याच दिवशी पुन्हा शुद्धिपत्रक काढून जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांच्या चार लेखाशीर्षांतून रक्कम वळती करण्यास परवानगी.

काय होता ६ ऑक्टोबर २०२२चा ऑडिट अहवाल

सहसंचालक यांच्या पथकाने यावल ग्रामीण रुग्णालयाची पडताळणी करून ६ ऑक्टोबर २०२२ रोजी जिल्हा शल्यचिकित्सकांना गंभीर आक्षेपांचा अहवाल पाठवला होता.

माल पडून :

मागणी नसताना निरुपयोगी माल शवविच्छेदन गृहाशेजारी पडून असल्याचे प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत आढळून आले.

वेतनाचा निधी वळवला

वेतन (०१) व कंत्राटी सेवा (१०) या लेखाशीर्षांतून यावल उपकोषागारातून संस्थेला २४ कोटी १८ लाख रुपये नियमबाह्यपणे अदा केल्याची नोंद आहे.

जीएसटीचा मोठा घोटाळा

करमुक्त किंवा कमी कर असलेल्या वस्तूंवर १८ टक्के जीएसटी लावून ४.६० कोटींहून अधिक अतिरिक्त रक्कम आकारली.

कागदपत्रे लपवली

खरेदी समितीचे इतिवृत्त आणि मूळ नस्त्या मागणी करूनही लेखापरीक्षण पथकाला उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यामुळे या प्रकरणावर संशय बळावला.

कोरोनातील प्रकरण

लेखापरीक्षणाच्या अहवालानंतर तत्का. जिल्हा शल्यचिकित्सकांवर गुन्हा; करमुक्त वस्तूंनाही लावला १८% जीएसटी

अनावश्यक माल शवागाराशेजारील खोलीत विनावापर पडून असल्याचे लेखापरीक्षकांच्या अहवालात नमूद आहे. नऊ रुग्णालयांच्या नावापुढे प्रत्येकी १.५३ लाख रुपये तंतोतंत एकसारखी रक्कम दाखवून बिले लावल्याचे दिसून येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *