![]()
अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या गुन्ह्यात ताब्यात असलेल्या २१ वर्षीय तरुणाने किनगाव पोलिस ठाण्यातच गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी (दि.२३) पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आलेल्या या घटनेने पोलिसांच्या सतर्कतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हाडोळती परिसरातील १५ वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध असलेला अमित चव्हाण २० नोव्हेंबर रोजी तिला घेऊन गेला होता. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून २१ नोव्हेंबरला अमितविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. २२ नोव्हेंबरला दोघांना अहिल्यानगर रेल्वे स्थानकातून ताब्यात घेऊन किनगाव पोलिस ठाण्यात आणले. सोमवारी पहाटे तीनला मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी नेले असताना अमित ठाण्यातच होता. पहाटे चार ते पाचच्या दरम्यान त्याने लुंगीसदृश कपड्याने गळफास घेतला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. नातेवाईकांनी पोलिसांवर छळाचा आरोप करत ठिय्या आंदोलन केले होते. याप्रकरणी सीआयडी तपास करण्यात येईल. चार जण चौकशीच्या फेऱ्यात तरुणाच्या मृत्यूप्रकरणी त्या रात्री कर्तव्यावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी होण्याची शक्यता आहे. सपोनि संकेत दिघे, आयओ तथा पीएसआय एस. एम. तोंडारेंसह अन्य दोन कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत. तोंडारे हे सध्या प्रशिक्षणार्थी आहेत. या चौघांवर कारवाईची टांगती तलवार आहे.
Source link
अपहरणाच्या गुन्ह्यातील तरुणाचा लातूर पोलिस ठाण्यात गळफास:अल्पवयीन मुलीस पळवल्याचा गुन्हा दाखल झाल्याने टोकाचे पाऊल